Site icon लोकाशा-बंब न्यूज

बीडकरांचे प्रेम पाहूण कुटे भारावले, तुमच्या सर्वांच्या बळामुळे ज्ञानराधा पुन्हा ट्रकवर आली, तुमचे हे बळ असेच माझ्या पाठीशी राहू द्या, तुमच्या, ग्राहकांच्या विश्‍वासाला कधीच तडा जाऊ देणार नाही – सुरेश कुटे


बीड, दि. 15 (लोकाशा न्यूज) : आयकर विभागाने सुरु केलेले सर्च संपल्यानंतर कुटे ग्रुपचे सर्वेसर्वा सुरेश कुटे आणि अर्चना कुटे यांनी रविवारी रात्री आठ वाजता पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून देताना ते चांगलेच भावनिक झाल्याचे पाहायला मिळाले. ग्राहकांचा विश्वास आणि त्यांच्या प्रेमातून कधीही उतराई होता येणार नाही असे सुरेश कुटे यावेळी म्हणाले. यावेळी बोलताना ते गहिवरून गेले होते.
मागच्या चार दिवसात घडलेला लेखाजोखा सुरेश कुटे आणि अर्चना कुटे यांनी पत्रकारांसमोर मांडला. 17 वर्षात आम्ही ज्ञानराधाच्या माध्यमातून ग्राहकांचा विश्वास जपला आहे. 51 शाखेतून आम्हाला सर्वांनी खूप पाठिंबा दिला. हे कधीच विसरू शकत नाही. 40 वर्षात पहिल्यांदा असं घडलं की, आयकर विभागाच्या अधिकार्‍यांनी आम्हाला सर्च मोहिम  सुरु असताना व्हिडिओ प्रदर्शित करण्याची चक्क संधी दिली. जे इतिहासात कधीच घडले नव्हते ते बीडमध्ये घडले. माझा जीव चार दिवसात खूप कासावीस झाला. लोकांना भेटता येतं नव्हते. ग्राहक चिंतेत होते, पण काळजी करण्याची आता कोणालाही गरज नाही. आम्ही जे आहोत ते आपल्यामुळेच, आता सर्व सुरळीत झाले आहे. मी आज अनेक शाखांना भेटी देवून संवाद साधला आहे. मी बँकेत पुन्हा सर्वांना भेटणार आहे. सर्च मोहिम सुरु असताना अधिकार्‍यांना आमचं घरही साध आहे, आम्ही साधी माणसं आहोत, हे कळाले. खरं तर आपल्या प्रेमाने आम्हाला मोठं केलं, आम्ही जमिनीशी नाळ जोडलेली आहे. अडचणीच्या काळात ग्राहकांनी आम्हाला खूप जीव लावला. यातून आम्हाला खूप शिकायला मिळालं. सर्वांच्या प्रेमामुळे आम्ही खूप भारवल्याचे सांगत सुरेश कुटे भावनिक झाले होते. वास्तविक पाहता तुम्ही जे भरभरून प्रेम दिले त्याची परतफेड कधीच करू शकत नाही, तुम्ही एवढा सपोर्ट केला तो मी कधीच विसरू शकत नाही, हा वेगळा क्षण होता. अधिकारी कुटे ग्रुपच्या सर्च मोहिमेसाठी आल्यानंतर काही वेळ आम्हाला समजले नाही, आम्ही फक्त कामच करतोत, हे त्यांना सर्च मोहिमेतून दिसून आले. मात्र या मोहिमेचा परिणाम ज्ञानराधा बँकेवर झाला, कुटे ग्रुप आणि ज्ञानराधा बँक या दोन्ही वेगवेगळ्या संस्था आहेत, सर्च मोहिम ही फक्त कुटे ग्रुपवर होती, त्या मोहिमेचा बँकेशी काहीही संबंध नव्हाता. एका अफवेमुळे बँकेत गर्दी होवू लागली. यावेळी संवाद साधण्यासाठी अधिकार्‍यांनी दिल्लीपर्यंत फाईट करून मला संवादाचा व्हिडीओ व्हायरल करण्यास परवानगी मिळवून दिली, जी की इतिहासात अशी पहिलीच घटना असावी, यावेळी सर्वच माध्यमांनी आम्हाला खुप साथ दिली, त्यामुळे ठेवीदारांमध्ये प्रचंड विश्‍वास आला, आणि ते पुन्हा बँकेत ठेवी ठेवू लागले. तुम्ही सर्व जण माझ्यासाठी एकजुटीने लढलात, तुमच्यामुळे शब्दांमुळे आम्हाला खुप ताकत मिळाली, या ताकतीचे रूपांतर आशिर्वादात झाले. यामुळेच बँक पुन्हा ट्रकवर आली, सुट्टी असतानाही आम्ही बँक चालू ठेवली, याही पुढे तुम्ही असेच माझ्यासोबत रहा, तुमच्या आणि ग्राहकांच्या विश्‍वासाला आम्ही कधीच तडा जावू देणार नाहीत, असा विश्‍वासही यावेळी सुरेश कुटेंनी बोलून दाखविला. यानंतर अर्चना कुटे यांनी सांगितले, कुटे ग्रुप मी पाहते. आणि सुरेश कुटे हे बँक पाहतात. दोन्ही भिन्न गोष्टी आहेत. इन्कम टॅक्सचा सर्च सर्वत्र होते, यातून आम्ही खूप मोठे माणसं झालो की काय असे वाटू लागले. यातून खूप काही शिकायला मिळाले असल्याचे त्यांनी सांगितले. आपली माणसं ओळखता आली. तुमचा विश्वास आम्हाला बळ देणारा ठरल्याचे सांगत त्यांनी यावेळी सर्वांचेच आभार मानले.

तुमचा सपोर्ट ही आमची ताकत – अर्चना कुटे
यावेळी कुटे ग्रुपच्या संचालिका अर्चना कुटे यांनीही आपले मत मांडले. या गोष्टी सगळीकडेच घडत असतात. हा सर्च होता, या सर्चमुळे आम्हाला बरीच माहिती मिळाली. जीवनात संकटे आलीच पाहिजेत, त्यातून मार्गही निघतात, अडचणीच्या काळात तुम्ही सर्वांनी खुप सपोर्ट केला, तुमचा हा सपोर्ट आमची खरी ताकत असल्याचे यावेळी अर्चना कुटे यांनी म्हटले.  

पुन्हा तेच ठेवीदार ठेवी ठेवू
लागले
या चार दिवसात आम्हाला माध्यमांसह बीडकरांनी प्रचंड प्रेम, बळ दिले. यामुळेच आम्हाला पुन्हा ठेवीदारांचा विश्‍वास जिंकता आला, त्यामुळेच आज पुन्हा तेच ठेवीदार ज्ञानराधामध्ये ठेवी ठेवू लागले आहेत, असेही यावेळी सुरेश कुटे यांनी म्हटले.

एका विनंतीवर अधिकार्‍यांनीही
कुटेंना खंबीरपणे साथ दिली
बीड जिल्हा हा ऊसतोड कामगारांचा जिल्हा आहे, अशा जिल्ह्यात मोठा उद्योग उभा करून तो सातासमुद्राच्या पलीकडे घेवून जाण्याचे काम सुरेश कुटे आणि अर्चना कुटे या दोघांनी खर्‍या अर्थाने केलेले आहे. त्यांच्या वागण्यात नेहमीच नम्र आणि आपलेपणा असतो, अगदी त्यांचा हाच स्वभाव तपासणीसाठी आलेल्या अधिकार्‍यांनाही भावला, त्यामुळेच तपासणीदरम्यान एक व्हिडीओ तयार करून तो व्हायरल करण्यास सर्च ऑफीसरने दिल्लीतून सुत्रे हालवून कुटेंना परवानगी दिली. दरम्यान एका विनंतीवर अधिकार्‍यांनीही कुटेंना खंबीरपणे साथ दिल्याचे यातून स्पष्टपणे दिसून येतेे.

शाखांना कुटेंनी दिल्या भेटी,
माध्यमांसह बीडकरांचे मानले आभार
सर्च मोहिम संपताच सुरेश कुटेंनी ज्ञानराधा बँकेच्या शाखांना भेटी देवून संवाद साधला, त्यांच्या या संवादामुळे पुन्हा ठेवीदारांमध्ये विश्‍वास वाढला आहे. या चार दिवसात त्यांना साथ देणार्‍या सर्व माध्यमांचेही त्यांनी पत्रकार परिषद घेवून आभार मानले आहेत.

पुन्हा त्याच जोमाने काम करू
कुटे ग्रुपचे जाळे ठिकठिकाणी निर्माण झाले आहे. या सर्च मोहिमेचा थोडाही परिणाम कुटे ग्रुपच्या व्यवसायावर झालेला नाही आणि याही पुढे होणार नाही, त्यामुळे कुणीही घाबरून जावू नये, पुन्हा तेवढ्याच जोमाने आपण सर्व जण मिळून काम करू, असा विश्‍वास यावेळी सुरेश कुटे आणि अर्चना कुटे यांनी बोलून दाखविला आहे.

Exit mobile version