Site icon लोकाशा-बंब न्यूज

घ्या या विशेष मोहिमेचा लाभ अन् करा बांधकाम कामगारांचे नुतनीकरण



बीड, दि.15 (मुकेश झनझने) ः- शासन आपल्या दारी या अभियानांतर्गत नोंदीत बांधकाम कामगारांना जलद गतीने व कोणत्याही अडथळ्याशिवाय लाभाचे प्रदान करणे तसेच बांधकाम कामगारांसाठी असलेल्या विविध योजनांची माहिती देणे, कागदपत्राची पूर्तता करून घेणे व प्रत्यक्षात लाभ देणे आदी उपक्रम राबविले जात आहेत. या अनुषंगाने नोंदीत बांधकाम कामगारांचे राहिलेले नुतनीकरण करण्यासाठी दि.16 ते 20 ऑक्टोंबर या कालावधीत विशेष अभियान राबविण्यात येणार आहे. या विशेष अभियानाचे आयोजन कामगार सुविधा केंद्र, जुना मोंढा, ढेपे संकुल, दुसरा मजला, संतोषीमाता मंदिरासमोर, बीड याठिकाणी करण्यात आले असल्याची माहिती सरकारी कामगार अधिकारी श्रीहरी मुंढे यांनी दिली. महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ बीड अंतर्गत बांधकाम कामगारांची नोंदणी, नुतनीकरण, विविध शैक्षणिक सहाय्य योजना, आरोग्य विषयक योजना सामाजिक सहाय्य योजना, आर्थिक सहाय्य योजना, नोंदीत बांधकाम कामगारांची आरोग्य तपासणी, नोंदीत बांधकाम कामगारांना किट वाटप, ओळखपत्र वाटप इत्यादी योजना राबविल्या जात आहेत. बांधकाम कामगारांची नोंदणी, नुतनीकरण व विविध योजनेच्या लाभाचे अर्ज ऑनलाईन प्रणालीद्वारे स्वीकारले जात असून त्यासाठी मंडळाने संकेतस्थळ विकसित केलेले आहे. त्याद्वारे बांधकाम कामगारांकडून अर्ज प्राप्त होत आहेत. तथापी असे असतांनाही बर्‍याच नोंदीत बांधकाम कामगारांचे नुतनीकरण झालेले दिसून येत नाही. राज्य शासनच्या शासन आपल्या दारी या अभियानांतर्गत नोंदीत बांधकाम कामगारांना जलद गतीने व कोणत्याही अडथळ्याशिवाय लाभाचे प्रदान करणे तसेच बांधकाम कामगारांसाठी असलेल्या विविध योजनांची माहिती देणे, कागदपत्राची पूर्तता करून घेणे व प्रत्यक्षात लाभ देणे इत्यादी उपक्रम राबविले जात आहेत. तथापी ज्या बांधकाम कामगारांनी त्यांचे नोंदणीनंतर नुतनीकरण केलेले नाही अशा बांधकाम कामगारांचे नुतनीकरण करून घेऊन त्यांना देय होणार्‍या योजनांचा लाभ देण्याच्या अनुषंगाने दिनांक 16 ऑक्टोबर 2023 ते दिनांक 20 ऑक्टोबर 2023 या कालावधीमध्ये विशेष अभियानाचे आयोजन कामगार सुविधा केंद्र, जुना मोंढा, ढेपे संकुल, दुसरा मजला, संतोषीमाता मंदिरा समोर, बीड याठिकाणी करण्यात आलेले आहे.


Exit mobile version