नवी दिल्ली, 13 ऑगस्ट : जर तुमची कमाई 15 हजारांपेक्षा कमी आहे आणि तुमचा निवृत्तीनंतर कोणतीही योजना नाही आहे, तर मोदी सरकारची ही योजना तुमच्या फायद्याची ठरू शकते. यामध्ये 60 वर्षानंतर प्रत्येक महिन्याला 3 हजार या हिशोबाने वार्षिक 36 हजार रुपये मिळतील. या योजनेमध्ये 18 ते 40 वयोगटातील नागरिक जोडले जाऊ शकतात. या योजनेचे नाव आहे पीएम श्रम योगी मानधन योजना. या योजनेमध्ये वेगवेगळ्या वयाच्या हिशोबाने 55 ते 200 रुपये महिना अशाप्रकारे योगदान करण्याचा पर्याय आहे. 18व्या वर्षी तुम्ही या योजनेशी जोडले गेलात तर महिन्याला 55 रुपयाचे योगदान द्यावे लागेल. जर तुम्ही तिसाव्या वर्षी या योजनेशी जोडले गेलात तर 100 रुपये आणि 40व्या वर्षी तुम्ही या योजनेशी जोडले गेलात तर 200 रुपयाचे योगदान द्यावे लागेल. अठराव्या वर्षी या योजनेमध्ये तुम्ही पैसे गुंतवण्यास सुरुवात केल्यास तुम्हाला वार्षिक 660 रुपये द्यावे लागतील. असे एकूण 42 वर्षांसाठी तुम्हाला 27,720 रुपयांची गुंतवणूक करावी लागेल. त्यानंतर वयाच्या साठाव्या वर्षानंतर तुम्हाला मासिक 3000 रुपये पेन्शन आजीवन मिळेल. जे योगदान खातेधारक करेल, तेवढेच योगदान सरकारकडून देखील करण्यात येते. मोदी सरकारने गेल्या वर्षी असंगठित कामगारांसाठी पंतप्रधान श्रमयोगी योजनेची सुरूवात केली होती. या योजनेमध्ये असंगठित क्षेत्रामध्ये काम करणारी कोणतीही व्यक्ती जोडली जाऊ शकते. या व्यक्तीचे वय 18 ते 40 वर्षांदरम्यान असणे बंधनकारक आहे त्याचप्रमाणे त्याचे मासिक उत्पन्न 15000 पेक्षा कमी असणे गरजेचे आहे. जर तुमचे एझऋ/छझड/एडखउ मध्ये आधीपासूनच खाते असेल, तर याठिकाणी तुम्हाला खाते उघडता येणार नाही. त्याचप्रमाणे तुमचे उत्पन्न करयोग्य देखील नसले पाहिजे.
कसे सुरु कराल या योजनेत खाते?