Site icon लोकाशा-बंब न्यूज

झालेली चूक भविष्यात मतदारच दुरुस्त करतील-महंत विठ्ठल महाराज, साथ,समर्थन आणि विश्वास ठेवा-माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर

बीड/प्रतिनिधी
स्वर्गीय काकूंच्या राजकीय जीवनापासून तर जयदत्त अण्णांच्या आजपर्यंतच्या राजकीय प्रवासाचा मी साक्षीदार आहे झालेली चूक मतदाराच आता दुरुस्त करतील असा विश्वास ह भ प महंत विठ्ठल महाराज गहिनीनाथ गडकर यांनी व्यक्त केला आहे तर आगामी काळात उत्तम साथ खंबीर समर्थन आणि विश्वास ठेवा त्याला तडा जाऊ देणार नाही असे अभिवचन माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी दिले आहे

आज शिरूर कासार येथे श्री गजानन नागरी सहकारी बँकेच्या आठव्या शाखेचा उद्घाटन सोहळा ह भ प महंत विठ्ठल महाराज गहिनीनाथ गड यांच्या शुभहस्ते तर माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला यावेळी आमदार सुरेश धस यांचे बंधू देविदास धस यांची प्रमुख उपस्थिती होती कार्यक्रमाला शुभाशीर्वाद देण्यासाठी महंत विवेकानंद शास्त्री श्री 1008 महामंडलेश्वर त्रिवेंदानंद सरस्वती महंत राधाताई महाराज सानप महंत स्वामी जनार्दन महाराज, 108 वीरूपक्ष शिवाचार्य महाराज, महंत प्रल्हाद महाराज विघ्ने, महंत रामेश्वर महाराज शास्त्री, महंत श्रीरंग स्वामी महाराज, महंत अतुल महाराज शास्त्री, महंत यादव महाराज बडे, महंत भानुदास महाराज शास्त्री, महंत बाबासाहेब महाराज बडे, महंत हनुमंत महाराज शास्त्री, तसेच रोहितदादा क्षीरसागर,विलास बडगे,दिनकर कदम,गंगाधर घुमरे,गणपत डोईफोडे,नानासाहेब काकडे,अरुण बोगांने,जयदत्त थोटे,अशोक सवासे,शेख मैनू भाई,किसन बडे,विष्णुपंत सोनवणे,रमेश तळेकर,सुभास क्षीरसागर, मुखींद लाला, शेख खाजा,कलंदर पठाण,रोहिदास पाटील गाडेकर, प्रकाश देसरडा, समृध जाधव, सभापती उषाताई विजय सरवदे, सतीश काटे, सुधाकर मिसाळ,अर्जुन दादा गाडेकर,बबनराव तात्या ढाकणे,फैयाज भाई शेख,
मीनाताई उगलमुगले,जालिंदर सानप,ऍड जयंत राख,अजिनाथ गवळी,भरत जाधव,संदीप ढाकणे,बाजीराव सानप, ज्ञानदेव बडे,बद्रीनाथ तांबे,निवृत्ती बेदरे, अशोक मोरे,गणेश भांडेकर, सागर केदार,अक्षय रनखांब, जीवन डोळस डॉ प्रशांत सुळे, बाबुराव केदार कल्याण तांबे पांडुरंग अभंग प्रकाश बडे प्रकाश खेडकर पोपट शिरसाट,शेख बिबन,सुलेमान पठाण,आयुब तांबोळी,प्रभाकर सानप, संजय सानप, गणेश घोलप,बाप्पासाहेब खेडकर,दिलीप उगले,पंढरीनाथ उगले,शाहूरव भोसले,शेषराव आरेकर व शिरूर येथील पत्रकार आदींची उपस्थिती होती
प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दिप प्रज्वलित करून कार्यक्रमास सुरुवात झाली,प्रास्ताविक बँकेचे उपाध्यक्ष जगदीश काळे यांनी केले तर उपस्थित मान्यवरांचे स्वागत शेख जलील अरुण गोरे सतीश तांगडे दत्तात्रय डोईफोडे आदेश नहार राजेंद्र मुनोत अर्जुन बहिरवाळ शरद ढाकणे अरुण डाके, सुभाष क्षीरसागर शैलजा आघाव यांच्या हस्ते करण्यात आले

यावेळी बोलताना ह भ प महंत विठ्ठल महाराज म्हणाले अडचणीच्या काळात धावून येणारा नेता म्हणजे जयदत्त आहेत आज त्यांनी सर्वसामान्यांच्या अर्थकारण लक्षात घेऊन या ठिकाणी गजानन बँकेच्या आठव्या शाखेचा शुभारंभ केला आहे काकूंच्या आणि अण्णांचा सगळा राजकीय प्रवास मी पाहिला आहे, जिल्ह्यातील सर्व समाजाशी त्यांचे जवळचे संबंध असल्यामुळे समाजाशी नाळ जोडला गेलेला हा नेता आहे, झालेली चूक भविष्यात दुरुस्त होईलच आणि अण्णा पुन्हा एकदा आपल्या राजकीय यशाची पायरी चढतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला

यावेळी बोलताना देविदास धस म्हणाले की, बीड मतदार संघात आणि बीड जिल्ह्यात विकासाची आणि सामान्यांशी जोडला गेलेला नेता म्हणून पाहिले जाते आगामी काळात पुन्हा तीच चूक होऊ देऊ नका सामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी आपला माणूस हवा असतो म्हणूनच जयदत्त अण्णांनी राजकारणाबरोबरच अर्थकारण मजबूत व्हावे यासाठी ही सेवा सुरू केली आहे त्याचा उपयोग करून घ्या,देवाण घेवाण विश्वासाने जिथे होते तिथेच व्यवहार उत्तम राहतात
यावेळी बोलताना माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर म्हणाले की,या नवीन उपक्रमास आशीर्वाद देण्यासाठी आज संत महंतांची उपस्थिती लाभली आहे, येतानाच विघ्नहर्ताचे आशीर्वाद घेऊनच आलो आहे, आज सामान्यांच्या अर्थकारणाची पूर्तता व्हावी यासाठी शिरूर शहरात नव्या आठव्या शाखेची सुरुवात करत आहोत, शिरूर तालुक्यातून मला राजकीय पाठिंबा मोठा मिळाला आहे, बँक आणि खातेदारांच्या मध्ये विश्वास मोठा असतो आजपर्यंत गजानन बँकेचा प्रवास हा केवळ खातेदारांच्या विश्वासावरच क्रमांक एक वर राहिला आहे त्यामुळे बँकेला आतापर्यंत सहा मोठे पुरस्कार मिळाले आहेत, भविष्यात लवकरच संभाजीनगर आणि पिंपळनेर अशा दोन शाखा सुरू करत आहोत आम्ही केवळ सामान्यांचा विश्वास या माध्यमातून संपादित करत आहोत गुणवत्तेच्या बाबतीत बीड जिल्हा कमी नाही जवळच असलेल्या आष्टी तालुक्यातील अविनाश साबळे या तरुणांनी आपल्या देशाला सुवर्णपदक मिळवून दिले आहे त्याचबरोबर एमपीएससी सारख्या परीक्षेत जिल्ह्यातील विद्यार्थी राज्यात सर्वात पुढे आहेत, ऊसतोड मजुरांचा जिल्हा नव्हे तर गुणवंतांचा जिल्हा म्हणून आता ओळख निर्माण होऊ लागली आहे, सिंदफणा नदीची उंची, 33 केवी केंद्र, साठवण तलाव आणि अखंड वीज मिळणे हे प्रश्न सुटणे महत्त्वाचे आहेत,राजुरी ते खरवंडी आणि राजुरी ते पाथर्डी असे 180 आणि 140 कोटी रुपयाचे रस्ते आता पूर्ण होत आहेत, जे की आपण आपल्या कार्यकाळात जाणीवपूर्वक मंजूर करून घेतले आहेत, काकूंचा वसा आणि वारसा सामर्थ्याने पुढे नेण्याचा पण केला आहे, माझ्या प्रत्येक उपक्रमाला संतांचे आशीर्वाद मिळतात जिल्ह्यात पाण्याचा प्रश्न गंभीर होत आहे तलाव कोरडे पडू लागले आहेत जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण होत आहे अशा परिस्थितीत शासन दरबारी पाठपुरावा करून सामान्यांना दिलासा देण्याचे काम यापुढे करायचे आहे असे सांगून त्यांनी सुरू झालेल्या बँक शाखेत ग्रामस्थांनी खाते उघडून व्यवहार सुरू करावेत असे आवाहन केले,यावेळी बँकेचे अधिकारी,कर्मचारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते, यावेळी मानूर ग्रामपंचायत तर्फे आणि परिसरातील गावकऱ्यांच्या वतीने माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांचा सत्कार करून स्वागत करण्यात आले

Exit mobile version