Site icon लोकाशा-बंब न्यूज

राहत इंदोरी यांचे हे गाणे तुम्हाला माहित आहेत का ?


लोकाशा साहित्य
५० वर्षे ज्या शायर ने जगातील हिंदी उर्दू रसिकांच्या मनावर कानावर अधिराज्य केले ते डॉ राहत इंदोरी यांनी हिंदी चित्रपटा साठी देखील काही गाणे लिहले आहेत . आम्हाला ते गीत आज हि आठवतात मात्र ते गीत राहत इंदोरी यांनी लिहले आहेत हे अनेकांना माहित नाही . म्हणूनच आज शब्दांजली वाहताना असेच काही गीत आम्ही लोकाशाच्या वाचकांना सांगणार आहोत .
गोविंदा व करिष्मा कपूर यांच्यावर चित्रित झालेले “ तुमसा कोई प्यारा नही है , क्या चीज हो तुम खुद तुमे मालूम नही है , बॉबी देवोल आणि ट्विंकल खन्ना यांच्यावर चित्रित झालेले ” चोरी चोरी जब निंदे उडी मिशन कश्मीर “ प्रीती झिंटा यांचे बूम रो बूम रो , संजू बाबा चे एम बोले एम बोले तो मास्टर , राज या चित्रपट मधील दिल को रोका रोका हे गीत राहत इंदोरी यांनी लिहलेले आहे . रात क्या मांगे हे खुद्दार चित्रपटातील गाणे त्यांनीच लिहलेले आहे . मेरे खयाल मेरे दिल के नजर मे रहो , दिल का दरवाजा खुलला है राजा आठ दिन कि छुट्टी लेके आजा , खत लिखना ( खुद्दार ) , नाजायज १९९५ तुझे प्यार करते करते , जाने ओ कैसा चोर था दुपट्टा चुरा गया , इश्क हुवा तुज्झे जानम ( हिमालय पुत्र ) देखो देखो हम जानम हम हे अमीर खान व अजय देवगण च्या इश्क १९९७ ) मधील गीत तुम्हाला तर आठवत असेलच , प्रेम अगण १९९८ हम तुमसे मोहब्बत करते है , हा जुदाई से डरता है दिल फिल्म करीब (१९९८ ) २००५ जुर्म मधील मेरी चाहतो का समंदर तो देखो , मुझे भी अपना कहकर देखो . ४८ चित्रपटात त्यांची गाणे आहेत . ९० च्या दशकात राहत इंदोरी यांनी फिल्मी जगताला अप्रतिम गीत लिहले . राहत कुरेशी नाव असलेले इंदोर शहर असल्याने त्यांना इंदोरी म्हणून ओळखले जाऊ लागले . उर्दू मुशायरा वर डॉक्टर ही पदवी प्राप्त केली .

Exit mobile version