बीड दि.२१ (प्रतिनिधी):
पतीच्या आत्महत्या प्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाघोली येथील सहशिक्षका सविता बाबुराव कांबळे यांना निलंबित करण्याचे आदेश बीड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश पाठक यांनी दिनांक २१ सप्टेंबर २०२३ रोजी दिले.
या संदर्भात माहिती अशी की, धारूर तालुक्यातील आसरडोह येथील सविता बाबुराव कांबळे या शिक्षिकेच्या पतीने आत्महत्या केल्याप्रकरणी संबंधित शिक्षिकेविरुद्ध गुन्हा र. नं. २२५/! २०२३ कलम ३०६, ३४ नुसार २३ सप्टेंबर २०२३ रोजी गुन्हा दाखल झाला होता. शिक्षक पेशाला न शोभणारे गैरवर्तन सिद्ध झाल्यामुळे जिल्हा परिषद अधिनियम १९६७ मधील नियम ३ नुसार संबंधित शिक्षकेला निलंबित करण्याचे आदेश देण्यात आले. मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश पाठक यांनी दि.२१ रोजी सविता बाबुराव कांबळे या शिक्षिकेला २३ सप्टेंबर २०२३ पासून निलंबित करण्याचे आदेश दिले आहेत. संबंधित शिक्षकेला निलंबन काळातील नियुक्ती आष्टी येथे देण्यात आली आहे.
पतीच्या आत्महत्या प्रकरणी;शिक्षिका सविता कांबळे निलंबित, सीईओ अविनाश पाठक यांचे आदेश
