बीड, दि.21 (लोकाशा न्युज) ः- बीड उपविभागीय अधिकारी पदाचा अतिरिक्त पदभार लघू पाटबंधारे विभागाच्या उपजिल्हाधिकारी कविता जाधव यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. काल दि.20 सप्टेंबर रोजी कविता जाधव यांनी पदभार स्वीकरला.
बीड उपविभागीय अधिकारी पद मागील काही दिवसांपासून रिक्त असल्याने याचा पदभार अतिरिक्त अधिकार्यांवरच चालवला जात आहे. बीड उपविभागीय अधिकारी पदाचा पदभार अतिरिक्त स्वरूपात जिल्हा पुरवठा अधिकारी ओंकार देशमुख यांच्याकडे होता. यात बदल करून जिल्हाधिकारी दीपा मुधोळ यांनी आता बीड उपविभागीय अधिकारी पदाचा पदभार लघू पाटबंधारे विभागाच्या उपजिल्हाधिकारी कविता जाधव यांच्याकडे सोपवला असून जाधव यांनी काल तो स्वीकारला आहे
बीड उपविभागीय अधिकारी पदी कविता जाधव; स्वीकारला पदभार
