Site icon लोकाशा-बंब न्यूज

बीड आणि कड्यात एफडीएची छापेमारी, बीडमध्ये 290 लिटर तर कड्यात 248 लिटर सोडायुक्त दूध केले नष्ट


बीड,कडा, दि. 13 (लोकाशा न्यूज) : जिल्हा दूध भेसळ समिती व अन्न व औषध प्रशासन, बीडकडून मे. माऊली मिल्क प्रॉडक्ट, बार्शी नाका, बीड येथे बुधवारी दि. 13 सप्टेंबर रोजी तपासणी करण्यात आली. तपासणीदरम्यान संबंधिताकाकडे सोडा हे भेसळकारी पदार्थ आढळून आला आणि 140 लिटर गाय दूध व 150 लिटर म्हशीचे दूध संशयाच्या आधारे नष्ट करण्यात आले. तसेच पेढी अन्न सुरक्षा व मानके, कायदा 2006 चे उल्लंघन करत असल्याने सामान्य जनहितार्थ पेढीमध्ये आढळून आलेल्या तुरटीची पूर्तता करे पर्यंत विक्री बंदचे आदेश देण्यात आले. बार्शी नाका परिसरातील मे माऊली मिल्क प्रॉडक्ट येथे ही कारवाई एफडीए व जिल्हा दूध भेसळ समितीने केल्यानंतर तपासणी दरम्यान काढलेले नमुने विश्लेषणासाठी पाठविण्यात आले. पुढील कारवाई नमुने अहवाल प्राप्त झाल्यावर करण्यात येईल. ही कारवाई अतिरिक्त जिल्हाधिकारी त्रिगुण कुलकर्णी , बीड व अन्न व औषध प्रशासनाचे औरंगाबाद विभाग आयुक्त अजित मैत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक आयुक्त सय्यद इम्रान हाश्मी यांच्या उपस्थितीत अन्न सुरक्षा अधिकारी संदीप देवरे यांनी केली. यावेळी अन्न व औषध प्रशासनाचे नमुना सहायक उमेश कांबळे व दूध संकलन परियवेक्षक दत्तात्रेय कोंदिराम थोरात व विस्तार अधिकारी संतोष  मोराळे हे उपस्थित होते. तसेच दुसरी छामेवारी आष्टी तालुक्यातील कडा येथे करण्यात आली. कडा येथील कानिफनाथ दूध संकलन केंद्राची अन्न औषध प्रशासन आणि जिल्हा दूध भेसळ समितीच्या वतीने बुधवारी 13 सप्टेंबर रोजी तपासणी करण्यात आली यावेळी अधिकारी आणि कर्मचार्‍यांच्या पथकाने संशयाच्या आधारे 248 लिटर  गायीचे दूध नष्ट करण्यात आले. या दुधाची किंमत 8 हजार 432 रुपये आहे.  तपासणी दरम्यान काढलेले 3 नमुने विश्लेषणासाठी पाठवण्यात आले व पुढील कारवाई नमुने अहवाल प्राप्त झाल्यानंतर करण्यात येईल. ही कारवाई अतिरिक्त जिल्हाधिकारी त्रिगुण कुलकर्णी, सह आयुक्त अन्न व औषध प्रशासन अजित मैत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी गायकवाड, सहायक मुख्तार शेख, एस.ए.वैधमापक, सोनवणे झेड.के. विस्तार अधिकारी व पोलिस भावले यांनी केली.

Exit mobile version