धाराशीव, बीड, दि. 8 (लोकाशा न्यूज) : भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांच्या संवेदनशीलतेचा प्रत्यय पुन्हा एकदा अनुभवास आला. धाराशीव जिल्ह्यातील मराठा समाजाच्या तरूणाने आरक्षणावरून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडल्यामुळे त्यांनी शुक्रवारी शिव-शक्ती परिक्रमे दरम्यान कार्यकर्त्यांकडून पुष्पगुच्छ, हार-तुरे न घेता फक्त हात जोडून स्वागत स्विकारले. दरम्यान उद्या दि. 9 सप्टेंबर रोजी पंकजाताईंची शिवशक्ती परिक्रमा बीड जिल्ह्यात पोहचणार आहे.
पंकजाताई मुंडे यांची शिव-शक्ती परिक्रमा शुक्रवारी श्रीक्षेत्र गाणगापूर येथे दर्शन घेऊन धाराशीव जिल्हयात आली. जिल्हयाच्या सीमेवर बोळेगाव, आलूर, मुरूम, नळदुर्ग, जळकोट येथे पंकजाताई मुंडे यांचे भव्य स्वागत करण्यासाठी कार्यकर्ते पुष्पगुच्छ, हार-तुरे घेऊन रस्त्यावर जमले होते पण पंकजाताईंनी असे स्वागत स्विकारण्यास साफ नकार दिला. मराठा समाजातील तरूणाने आरक्षणाच्या प्रश्नावरून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे, अशा परिस्थितीत असं स्वागत घेणं माझ्या मनाला प्रशस्त वाटत नाही असे सांगून केवळ हात जोडून जनता जनार्नदाला अभिवादन केले. पंकजाताईंच्या या संवेदनशील मनाचा कार्यकर्त्यांना असा पुन्हा एकदा प्रत्यय आला. दरम्यान पंकजाताईंची ही शिवशक्ती परिक्रमा यात्रा आज बीड जिल्ह्यात दाखल होत आहे. सायंकाळी 05.00 वा. ही यात्रा बीड शहारात दाखल होत आहे. या निमित्ताने भारतीय जनता पार्टीच्या वतीने अभूतपूर्व स्वागताची जय्यत तयारी करण्यात आली आहे. महाराष्ट्रात बहुचर्चित शिवशक्ती परिक्रमा यात्रा स्वभूमीत येत असल्याने भव्य स्वागतासाठी पदाधिकारी, कार्यकर्ते व जनतेने आपल्या लाडक्या नेतृत्वाचे स्वागत करण्यासाठी बहु संखेने सहभागी व्हावे, असे आवाहन भाजपा जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के, सरचिटणीस सर्जेराव तांदळे, विक्रांत हजारी, प्रा. देविदास नागरगोजे, सलीम जहागीर,शांतीनाथ डोरले, चंद्रकांत फड, डॉ. लक्ष्मण जाधव, अजय सवाई, सुनील मिसाळ, गणेश पुजारी यांनी केले आहे. ताईंच्या स्वागतासाठी भव्य मोटार सायकल रॅली आयोजित केली असून, नगदनारायण चौक चर्हाटा फाटा- बालेपीर – नगर नाका – छत्रपती शिवाजी महाराज चौक पर्यंत काढण्यात येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे व्यासपीठ उभारले आहे. सायंकाळी 06.00 वा. ताईंचे भव्य स्वागत करण्यात येईल. तरी जिल्ह्यातील भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, नेते यांनी स्वागतासाठी मोटारसायकल सह चर्हाटा फाटा येथे 04.30 वा. मोठ्या संखेने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
अणदूरमध्ये कार्यकर्त्यांनी काढली
भर पावसात मिरवणूक
पंकजाताई मुंडे अणदूर येथे पोहोचताच मुसळधार पाऊस सुरू झाला. अशा पावसातही स्वागतासाठी जमलेल्या ग्रामस्थ व कार्यकर्त्यांनी खंडोबा मंदिरापर्यंत त्यांची मिरवणूक काढली. मंदिरात येऊन त्यांनी खंडोबाचे दर्शन घेतले. यावेळी झालेल्या छोटेखानी कार्यक्रमात ’ज्ञानेश्वरी’ भेट देऊन त्यांचं स्वागत करण्यात आलं. भाजपचे नेते प्रवीण घुगे, अर्चनाताई पाटील, दिपक आलुरे, दत्ता कुलकर्णी आदींसह ग्रामस्थ कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
—