Site icon लोकाशा-बंब न्यूज

मराठा आंदोलकांवरील लाठीचार्ज दुर्देवी ; सखोल चौकशीची पंकजाताई मुंडे यांची मागणी

परळी वैजनाथ ।दिनांक ०२।
मराठा आंदोलकांवर लाठीचार्ज झाला आणि ते जखमी झाले हे अत्यंत दुर्दैवी आहे. याची दखल शासनाने तात्काळ घ्यावी. या प्रकरणाची सखोल आणि निःपक्षपातीपणे चौकशी व्हावी अशी प्रतिक्रिया भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी व्यक्त केली आहे.एक ट्विट करून त्यांनी ही मागणी केली आहे.

  जालना जिल्ह्यातील शहागड येथे मराठा आक्रोश आंदोलन झाले.  यानंतर अंबड तालुक्यात येणाऱ्या अंतरवाली येथे २९ ऑगस्ट २०२३ पासून मनोज जरांगे पाटील यांचे आमरण उपोषण सुरू आहे. या आंदोलना दरम्यान काल शुक्रवारी ६ च्या सुमारास  अचानक पोलीसांकडून आंदोलकांवर अश्रु धुराच्या नळकांड्या फोडत, लाठीचार्ज करण्यात आला. या घटनेचा  पंकजाताई मुंडे यांनी निषेध केला आहे.
     याबाबत ट्विट करत पंकजाताई मुंडेंनी मराठा आंदोलकांवर लाठीचार्ज झाला आणि ते जखमी झाले हे अत्यंत दुर्दैवी आहे. याची दखल शासनाने तात्काळ घ्यावी. या प्रकरणाची सखोल आणि निःपक्षपातीपणे चौकशी व्हावी अशी मागणी केली आहे.

••••

Exit mobile version