Site icon लोकाशा-बंब न्यूज

परळीतील गुत्तेदार बंडु मुंडे खून प्रकरणातील वान्टेड आरोपी दादरमधून पकडला ; शहर पोलीस ठाण्याचे सपोनि भार्गव सपकाळ यांची यशस्वी कामगिरी

परळी वैजनाथ दि १३ (लोकाशा न्युज) :-

परळी तालुक्यातील किन्हेरवाडी या ठिकाणच्या प्रसिद्ध गुतदार बंडू मुंडे यांच्या खून प्रकरणातील मोस्ट वान्टेड आरोपी दादरमधून पकडण्यात परळी शहर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भार्गव सपकाळ यांना यश मिळाले आहे. सपोनि ऊ सपकाळ यांनी गुन्ह्याचा तांत्रिक तपास करताना या आरोपीला दादर पोलीसांच्या सहकार्याने पकडण्याची कामगिरी बजावली आहे.

परळी शहर पोलीस ठाण्यात कंत्राटदार आत्माराम उर्फ बंडू मुंडे खून प्रकरणी गुन्हा रजिस्टर क्रमांक १२८/२०२३ कलम ३०२, ३४ आय.पी.सी. अन्वये गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्याचा तपास परळी शहर पोलीस ठाण्याचे सपोनि सपकाळ करत आहेत. तांत्रिक तपासा दरम्यान पाहिजे असलेला आरोपी याचे दादर परिसरामध्ये लोकेशन दिसून येत होते.
एपीआय सपकाळ यांना दि. १३ रोजी ११.४५ वाजता एन. सी. केळकर रोडवर हनुमान मंदिर जवळ पाहिजे आरोपीत हा त्याच्या एका मित्रासोबत अचानक दिसून आला. तसेच ते दोघे सदर ठिकाणाहून निघून जाण्याच्या तयारीत दिसून आले. एपीआय सपकाळ हे सिव्हिल ड्रेसवर एकटेच असल्याने व वेळ कमी असल्याने त्यांनी तात्काळ कबूतरखाना येथील दादर वाहतूक विभागाचे कर्तव्यावरील पोलीस हवालदार ९७०११६/सुरेश भोसले तसेच हनुमान मंदिर सर्कल येथील वाहतूक पोलीस हवालदार ३०८२३/ बिन्नर यांना संशयित इसम पकडण्यास मदत करण्याची विनंती केली. प्रसंगावधान राखून पोलीस हवालदार भोसले व बिन्नर यांनी पानेरी जंक्शन येथील पोलीस हवालदार ९८०६३३/जंक्शन येथील पोलीस हवालदार सुधाकर पाटील यांना सुद्धा मदतीला बोलावून वाहतूक नियमन करण्याचा, कारवाया करण्याचा बहाना करत सदर पाहिजे आरोपी व सोबत असलेला त्याचा मित्र यांना तात्काळ ताब्यात घेतले. सोबत असलेल्या एपीआय भार्गव सपकाळ यांनी लागलीच मुख्य नियंत्रण कक्षास विनंती करून पुढील मदत मागितली असता शिवाजी पार्क पोलीस ठाण्याचे गस्ती वाहन व बीट मार्शल सदर ठिकाणी आल्यावर सदर आरोपीत नामे महेश नामदेव रोडे वय – २३ वर्षे व त्याचा मित्र सागर राजाराम इंगवले वय २३ वर्षे यांना शिवाजी पार्क पोलीस ठाणे येथे पुढील योग्य ती कारवाई करण्यास घेऊन गेले.
दादर वाहतूक विभागाचे पो. ह. क्रमांक ३०८२४/श्री तुकाराम बिन्नर, पो.ह. क्रमांक ९७०१६१/श्री सुरेश भोसले, पो. ह. क्रमांक ९८०६३३/सुधाकर पाटील यांनी प्रसंगावधान राखून खुनासारख्या गंभीर गुन्ह्यातील आरोपीतास पकडून ही कामगिरी केलेली आहे.
सदरची कारवाई परळी शहर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक भार्गव सपकाळ यांनी बीडचे पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, अंबाजोगाई विभागाच्या अतिरिक्त पोलीस अधीक्षक कविता नेरकर, पोलीस उपाधीक्षक चोरमले यांच्या मार्गदर्शनाखाली केली. ह्या धाडसी कारवाईचे सपोनि भार्गव सपकाळ यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

Exit mobile version