स्थानिकांच्या मदतीने शोध कार्य सुरू
लोकाशा न्यूज विवेक कचरे
राजेगांव:-माजलगाव तालुक्यातील पुरुषोत्तम पुरी येथे सध्या अधिक मास असल्याने पुरुषोत्तमाच्या दर्शनासाठी भारतभरातून भावीक भक्त येतात. पुरुषोत्तम पुरी येथे गोदावरी नदी वाहते या नदीमध्ये स्नान करून भाविक भक्त दर्शन घेतात स्नान करत असताना जालना जिल्ह्यातील एक एक भक्त गोदावरी नदीच्या पाण्यात बुडाला असल्याची माहिती स्थानिक ग्रामस्थांनी दिली आहे. यावेळी माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी व माजलगाव तहसीलदार वर्षा मनाळे दाखल झाले आहेत बुडालेल्या व्यक्तीचा शोध कार्य चालू आहे.
याविषयी माहिती अशी आहे की मारुती खवले वय ४५ वर्षं राहणार पाटोदा तालुका परतुर जिल्हा जालना हे शुक्रवार रोजी आपल्या नातेवाईका सोबत पुरुषोत्तम पुरी येथे दर्शनासाठी आले होते ते गोदावरी नदीमध्ये अंघोळ करण्यासाठी गेले होते या त्यांचा पाय घसरून पाण्यात बुडाले असल्याची माहिती त्यांच्या नातेवाईकांनी सांगितली आहे ही घटना शुक्रवार रोजी सकाळी नऊच्या दरम्यान घडली आहे बुडालेल्या व्यक्तीचा स्थानिक लोक शोध घेत असून यावेळी माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्याचे कर्मचारी व तहसीलदार वर्षा मनाळे घटनास्थळी दाखल झाले आहेत शोध कार्य चालू असल्याची माहिती स्थानिकांनी दिली आहे.