बीड, दि. 10 (लोकाशा न्यूज) : सीईओ अविनाश पाठक यांनी बीड जिल्हा परिषदेच्या कामाला गतीने सुरवात केली आहे. रूजू होताच त्यांनी झेडपीतील फाईलींची सिस्टीम बदलली आहे. त्यामुळे आता विभाग प्रमुखांच्या फाईल थेट नव्हे तर स्वीय शाखेतून सीईओंकडे येणार आहेत. विशेष म्हणजे त्यांनी बुधवारी रात्री दहा ते आकराच्या दरम्यान आरोग्य सेवेची पडताळणी करण्यासाठी नायगाव आणि लिंबागणेश येथील प्राथमिक आरोग्य केंद्रास अचाणक भेटी देवून झाडाझडती घेतली. यावेळी त्याठिकाणी त्यांना काही अधिकारी आणि कर्मचारी गैरहजर आढळून आले. आता याबाबत त्यांच्याकडून कडक कारवाई होणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
सीईओ अविनाश पाठक यांना संपूर्ण बीड जिल्ह्याचा बारकाईने अभ्यास आहे. त्यांनी यापुर्वी बीड जिल्ह्यात अप्पर जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी आणि डीसीसी बँकेचे प्रशासक म्हणून काम केलेले आहे. त्यामुळे जिल्ह्यात कुठे आणि कोणत्या ठिकाणी काय चालते, जिल्ह्याच्या विकासासाठी काय करावे लागले याचा बारकाईने अभ्यास आहे. याच धरतीवर बीड जिल्ह्याला पुढे घेवून जाण्यासाठी झेडपीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाच्या माध्यमातून त्यांनी आपल्या कामाला गतीने सुरवात केली आहे. रूजू होताच त्यांनी झेडपीतील फाईलींची सिस्टीम पुर्णपणे बदलली आहे. कोणतीही फाईल त्यांच्या स्वीय शाखेतूनच त्यांच्याकडे द्यावी, अशा स्पष्ट सुचना त्यांनी सर्व विभाग प्रमुखांना दिल्या आहेत. त्यानुसार तशी प्रक्रियाही आता झेडपीत सुरू झाली आहे. या सिस्टीममुळे झेडपीच्या कामात अधिक प्रमाणात पारदर्शकपणा येणार आहे. याबरोबरच कामचुकार कर्मचार्यांवरही त्यांचे बारीक लक्ष असल्याचे दिसून येत आहे. याअनुषंगानेच त्यांनी बुधवारी रात्री दहा ते आकरा दरम्यान पाटोदा तालुक्यातील नायगाव आणि बीड तालुक्यातील लिंबागणेश येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला अचाणक भेटी देवून झाडाझडती घेतली. यावेळी नायगावच्या केंद्रात आरोग्य सेविका श्रीम.मोहोळकर आणि परिचर खान हे उपस्थित होते. तर या केंद्राचे वैद्यकिय अधिकारी गैरहजर होते, सीईओंनी चाळीस मिनीट वाट पाहूनही ते वैद्यकिय अधिकारी केंेद्रात उपस्थित झाले नाहीत, यामुळे त्यांच्या उपस्थितीबाबत संशय वाटत असल्याचा ठपका त्यांनी ठेवला आहे. त्याचप्रमाणे लिंबागणेश येथील आरोग्य केंद्रात त्यांना एकही अधिकारी आणि कर्मचारी दिसून आला नाही. आता याच प्रकरणी सीईओंकडून कडक कारवाई होण्याची दाट शक्यता आहे.
सीईओंनी डीएचओंकडून अहवाल
मागविला
सीईओ अविनाश पाठक यांनी नायगाव आणि लिंबागणेश येथील आरोग्य सेवेची पडताळणी करण्यासाठी अचाणक भेट दिली असता या दोन्ही आरोग्य केंद्रात त्यांना अधिकारी आणि कर्मचारी गैरहजर अढळून आले. याबाबतच सीईओंनी डीएचओ उल्हास गंडाळ यांच्याकडून अहवाल मागविला आहे. त्यानुसार डीएचओंना येत्या 21 ऑगस्टपर्यंत अहवाल सीईओंकडे सादर करावा लागणार आहे.
फाईलींची सिस्टीम बदल्यामुळे
झेडपीच्या कामात येणार पारदर्शकता