Site icon लोकाशा-बंब न्यूज

आत्मा अंतर्गत महिलांच्या शेतकरी अभ्यास दौऱ्यास जिल्हाधिकारी दिपा मुधोळ यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून सुरवात

कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) बीड मार्फत मा. श्री एस एम साळवे, प्रकल्प संचालक (आत्मा) बीड यांचे मार्गदर्शनाखाली तालुका कृषी अधिकारी बीड श्री बी आर गंडे यांचे कार्यक्षेत्रातील मंडळ कृषी अधिकारी नेकनूर अंतर्गत 44 महिला शेतकरी यांचा आत्मा अंतर्गत राज्यांतर्गत महिला शेतकरी अभ्यास दौरा आयोजित करण्यात आला आहे. हा अभ्यास दौरा मौजे वांबोरी जि अहमदनगर येथे गगनगिरी शेतकरी उत्पादक कंपनी ,मौजे ब्राह्मणी येथे ग्रीन अप शेतकरी उत्पादक कंपनीची माहिती घेऊन महात्मा फुले कृषी विद्यापीठ ,राहुरी येथे फलोत्पादन आयुर्वेदिक औषधी वनस्पती व बीड जिल्ह्यातील प्रमुख पीक असलेले कापूस या पिकाची सविस्तर प्रशिक्षणासह प्रक्षेत्र भेट करणार आहेत तर नंतर कृषी विज्ञान केंद्र बाभळेश्वर यांच्या प्रक्षेत्राला भेट देऊन नाशिक येथील सह्याद्री फार्मर्स शेतकरी उत्पादक कंपनी यांना भेट देऊन प्रक्रिया उद्योग, मार्केटिंग व एक्सपोर्ट याबद्दल माहिती घेणार आहेत. कांदा लसूण संशोधन केंद्र राजगुरुनगर येथे ही भेट देणार आहेत. हॉर्टिकल्चर ट्रेनिंग सेंटर तळेगाव दाभाडे येथे शेडनेट हाऊस फळे व फुले या पिकांचे प्रशिक्षण या महिला घेणार आहेत त्यानंतर कृषी विज्ञान केंद्र बारामती येथे विविध विषयांचे दिवसभराचे प्रशिक्षण व प्रक्षेत्र भेट करणार असून शेवटच्या दिवशी राशीन येथे दळवी मसाले, कर्जत येथील जय हनुमान नर्सरी, श्री सद्गुरू दत्त मिल्क प्रोडक्शन, कोळवाडी, व जामखेड तालुक्यत लोणवडे येथे पान मळा पाहणी करून यांना भेटी देऊन माहिती आत्मसात करणार आहेत याकरिता बीड तालुक्यातील नेकनूर मंडळातील 44 महिलांनी सहभाग घेतलेला असून या अभ्यास दौऱ्याकरिता मा. जिल्हाधिकारी बीड श्रीमती दीपा मुधोळ- मुंडे यांनी हिरवी झेंडी दाखवून अभ्यास दौऱ्यास परवानगी दिली आहे. यावेळी उपस्थित अधिकारी श्री एस एम साळवे प्रकल्प संचालक आत्मा श्री के एस अंभोरे मंडळ कृषी अधिकारी नेकनूर श्री मुजमुले माहिती अधिकारी कार्यालय बीड पठाण जुबेर बीटीएम ,अशोक काळे एटीएम आत्मा व कृषी विभागातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते या दौऱ्या दरम्यान संपर्क अधिकारी म्हणून श्री अशोक काळे व श्रीमती शिंदे मॅडम समन्वय साधणार असून शेतकरी अभ्यास दौरा यशस्वी पार पाडण्यात महत्वाची भूमिका पार पडणार आहेत.

Exit mobile version