बीड पोलीसांचे ‘सीसीटीएनएस’मध्ये उत्कृष्ठ कामगिरीचे सातत्य कायम, पाचव्यांदा राज्यातुन अव्वल, जुन 2023 मध्येही राज्यातून पटकावला पहिला क्रमांक, एसपींच्या नेतृत्वाखाली सीसीटीएनएस विभागाची उल्लेखनिय कामगिरी
Lokasha Abhijeet
बीड, दि. 8 (लोकाशा न्यूज) : केंद्र शासनाच्या अत्यंत महत्वाच्या ई गव्हर्नन्स प्रकल्पाअंतर्गत सीसीटीएनएस ही प्रणाली विकासीत करण्यात आलेली आहे. त्याअंतर्गत ठाण्याचे कामकाज संगणकीकृत पध्दतीने चालते. अपर पोलीस महासंचालक, गुन्हे अन्वेषण विभाग, महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या कार्यालयाकडून सीसीटीएनएस प्रणालीमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणार्या राज्यातील एकुण 53 घटकांच्या मासिक कामगिरीचे मुल्यांकन करून उत्कृष्ठ कामगिरी करणार्या घटकांची क्रमवारी जाहीर करण्यात येते. सदरच्या कामगिरीची पडताळणी करतांना सीसीटीएनएस प्रणालीमध्ये अद्ययावत केल्या जाणार्या 18 फॉर्म (नोंदणी फॉर्म, तपास व अभियोग फॉर्म), महिला व बालकांवरील लैंगिक अत्याचार संबंधाने दाखल गुन्ह्यांची मुदतीत निर्गती करुन अभिलेख सीसीटीएनएस प्रणालीमध्ये अद्ययावत करण्याचे प्रमाण, सिटीझन पोर्टलवर ऑनलाईन प्राप्त अर्जाची मुदतित निर्गती, दैनंदिन दाखल गुन्ह्यांचे सीसीटीएनएस सिटीझन पोर्टलवर प्रकाशित करणे, सीसीटीएनएस प्रणाली मधील उपलब्ध अभिलेखाचा वापर करुन गुन्हे उघडकीस आनने आरोपी व संशईतावर दाखल पूर्व गुन्हयांचे अभिलेख पडताळणी करुन गुन्हयांच्या स्वरुपानुसार त्यावर प्रतिबंधक कारवाई करणे अशा विविध कामगिरीचे मुल्यांकण करून प्रत्येक महिण्यास राज्यातील उत्कृष्ट कामगिरी करणार्या जिल्ह्याची क्रमवारी जाहीर करण्यात येते. त्यासंबंधाने गुन्हे अन्वेषण विभाग (सीआयडी) महा. राज्य पुणे व्दारे केलेल्या जुन 2023 च्या मुल्यांकनात बीड जिल्हयाचा 201 पैकी 197 गुण प्राप्त करून राज्यातुन प्रथम क्रमांक आलेला आहे. यापुर्वी माहे फेब्रुवारी ते मे 2023 अशा सतत चार महिण्याच्या क्रमवारीमध्ये देखील बीड घटकाने प्रथम क्रमांक पटकावलेला होता. सीसीटीएनएस प्रणालीच्या उत्कृष्ठ कागिरीमध्ये सातत्य राखण्यात बीड पोलीसांना यश आलेले आहे. सदर कामगीरी पोलीस अधीक्षक श्री. नंदकुमार ठाकुर यांचे मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक श्री. सचिन पांडकर, पोनि श्री संतोष साबळे स्थागुशा, सीसीटीएनएस सेल बीड चे अधिकारी सपोनि श्री. श्यामकुमार डोंगरे (तत्कालीन), पोह निलेश ठाकुर, मच्छिद्र बीडकर, चंद्रसेन राऊत यांनी विशेष परिश्रम घेऊन वेळोवेळी कामकाज अद्ययावत करण्यासाठी विशेष मोहीम राबविली वेळोवेळी राबविण्यात आलेल्या विशेष मोहीमेला पोलीस ठाण्यांचे सीसीटीएनएस नोडल अंमलदारांनी उत्तम प्रतिसाद देत अथक परिश्रम करून हे यश मिळवून बीड पोलीस दलाच्या यशात नवीन उच्चांक स्थापन केला आहे. सदरची कामगिरी ही सीसीटीएनएस नोडल अंमलदारांचे अथक परिश्रमाचे फलीत आहे.