Site icon लोकाशा-बंब न्यूज

बीडकरांचे प्रेम पाहूण सीईओ अजित पवार गहिवरले, पवारांना निरोप देताना प्रत्येक अधिकारी आणि कर्मचार्‍यांच्या डोळ्यात आले पाणी, निरोपासाठी झेडपीत जनसागर लोटला, बीडच्या ईतिहासात पहिल्यांदाच सीईओंना दिला आगळ्या वेगळ्या प्रकारे निरोप, असा कर्तव्यदक्ष अधिकारी पुन्हा मिळणार नाही

बीडकरांचे प्रेम पाहूण सीईओ अजित
पवार गहिवरले
पवारांना निरोप देताना प्रत्येक अधिकारी आणि कर्मचार्‍यांच्या
डोळ्यात आले पाणी, निरोपासाठी झेडपीत
जनसागर लोटला, बीडच्या ईतिहासात पहिल्यांदाच
सीईओंना दिला आगळ्या वेगळ्या प्रकारे निरोप, असा
कर्तव्यदक्ष अधिकारी पुन्हा मिळणार नाही

बीड, दि. 8 (लोकाशा न्यूज) : बीड जिल्ह्याच्या विकासाबरोबरच सर्वसामान्यांना सक्षम करण्यासाठी ज्यांनी काम केलं, असे सीईओ अजित पवार यांची नुकतीच बदली झाली. त्यांना सोमवारी जिल्हा परिषदेबरोबरच ग्रामसेवक संघटनेकडून जिल्हा परिषदेच्या सभागृहामध्ये निरोप देण्यात आला. यावेळी बोलताना उपस्थित अधिकारी आणि कर्मचार्‍यांच्या डोळ्यात अक्षरक्ष: पाणी आलं. यावेळी सीईओ अजित पवार यांना आगळ्यावेगळ्या प्रकारे निरोप देण्यात आला. जो की यापुर्वी बीडच्या ईतिहासात कधीच घडला नसेल. बीडकरांचे हेच प्रेम पाहून अजित पवारांच्या अक्षरक्ष: गहिवरले. असा कर्तव्यदक्ष अधिकारी पुन्हा जिल्ह्याला मिळणार नाही.  यावेळी बोलताना सीईओ अजित पवार यांनी विविध किस्से सांगत, अधिकारी, कर्मचारी यांनी केलेल्या कामाचे कौतुक केले.  विहिरीची कामे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात झाली यासह इतरही कामे जिल्ह्यात झाले याचे समाधान असल्याचे मत यावेळी सीईओ अजित पवार यांनी बोलताना व्यक्त केले. विशेष म्हणजे त्यांना निरोप देण्यासाठी बीड जिल्ह्यातील अनेकांनी झेडपीत मोठी गर्दी केली होती.
बीड जिल्ह्यात झेडपीचे सीईओ म्हणून अजित पवार यांनी दोन वर्ष सक्षमपणे काम केले, सर्वांना सोबत घेवून काम केल्यामुळे
बीड जिल्ह्यात त्यांना मोठी कामे करता आली, मागच्या दोन वर्षांपासून जिल्ह्यात सुरू असलेल्या अजित पर्वामुळेच बीड जिल्हा खर्‍या अर्थाने पाणीदार झाला, मोठ्या मनाचा असलेल्या याच कर्तव्यदक्ष अधिकार्‍याची मागच्या चार दिवसांपुर्वी बदली झाली, बदली होवूनही त्यांच्या चेहर्‍यावर थोडीही नाराजी नव्हती, हा चेहरा तुम्हाला असाच हसरा दिसेल असे ते कालच्या निरोपाच्या कार्यक्रमात म्हटले, मात्र हा कार्यक्रम झाल्यानंतर त्यांना फुलांवरून गाडीपर्यंत आणण्यात आले, यावेळी त्यांच्या कामाचे टाळ्या वाजवून कौतूक करण्यात आले, यावेळी जमलेली गर्दी आणि बीडकरांचे प्रेम पाहून ते अगदी गहिवरून गेले. बीड जिल्हा ग्रामीण भागात असल्यामुळे या ठिकाणचा जर शेतकरी सक्षम झाला तर जिल्हा सक्षम होईल, या हेतूने जिल्हा परिषद मध्ये चांगले अधिकारी येणं अपेक्षित आहे. जिल्हा परिषद मध्ये सीईओ म्हणून अजित पवार यांनी अमुलाग्र बदल करत, जिल्ह्यातील सर्वसामान्यांना सक्षम करण्याचं काम केले. यामध्ये शेतकर्‍यांना शेततळे ,विहिरी, पाणंद रस्ते, घरकुले यासह ग्राम पंचायत अंतर्गत मोठा निधी देऊन, स्थानिकांना विविध शेती विषयी साहित्य सुद्धा शासनाच्या माध्यमातून उपलब्ध करून दिले. त्यांच्या पुढाकारातून जिल्ह्यातील शेतकर्‍यांना सक्षम होण्यास मोठी मदत मिळाली. सर्वात महत्वाचे म्हणजे जलजीवनचे मोठे काम उभे करून त्यांनी जिल्हा पाणीदार केला. त्यांच्या नेतृत्वात जिल्हा विकासात प्रगती करत असतानाच त्यांची बदली झाली, त्या अनुषंगाने काल त्यांना जिल्हा परिषद मध्ये अधिकारी कर्मचारी यांनी आगळ्यावेगळ्या पद्धतीने निरोप दिला. त्यांच्या केबिन पासून ते त्यांच्या वाहनापर्यंत कर्मचार्‍यांनी फुले टाकली होती.  यावेळी अनेकांच्या डोळ्यात अश्रू सुद्धा आले, विशेष म्हणजे त्यांनाही गहिवरून आले. यावेळी बोलताना सीईओ अजित पवार म्हणाले की तुमच्या हृदयातील प्रेम घेऊन जातोय, खूप पुण्य कमवले, जिल्ह्यामध्ये खूप काही करता आलं, असेही त्या यावेळी म्हणाले. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी वासूदेव सोळंके, जिल्हा ग्रामीण यंत्रणेच्या प्रकल्प संचालक संगितादेवी पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रदिप काकडे, ज्ञानेश्‍वर मोकाटे, चंद्रशेखर केकान, कॅफो सुरेंद्र केंद्रे, शिक्षणाधिकारी श्रीकांत कुलकर्णी, नागनाथ शिंदे, जलजीवन मिशनचे मुंडे, विक्रम सारूक, बीडओ मोराळे, सचिन सानप, नागरगोजे, केंद्रे, लेखाधिकारी जटाळ, बीईओ गणेश गिरी, शिवाजी अंडील यांच्यासह आदींची उपस्थिती होती.

पैसे नाही माणसं कमविली
जिल्ह्यात अधिकारी येतात आणि जातात. मात्र अशा वेळी बरेच जण फक्त पैसे कमवून जातात. याला मात्र सीईओ अजित पवार हे पुर्णपणे अपवादच ठरले आहेत. कारण त्यांनी आपल्या दोन वर्षाच्या सीईओ पदाच्या कार्यकाळात बीड जिल्ह्यात पैसे नव्हे तर फक्त आणि फक्त जिवाभावाची माणसं कमविली असल्याचे काल जिल्हा परिषदेमध्ये पहायला मिळाले.  

काम काय असते ते रूईमध्ये जावून
बघा
सीईओ अजित पवारांचा प्रत्येक गोष्टींवर बारीक अभ्यास आहे. त्यामुळेच ते कोणतंही काम अगदी प्रभावी आणि प्रमाणिकपणे करतात. त्यांच्या याच कामाचा अनेक नागरिकांना फायदा होतो, बीड जिल्हयात रूजू झाल्यानंतर त्यांनी तुती लागवडीतून जिल्ह्यातील शेतकर्‍यांना आर्थिक बळ देण्याचे काम केले, त्यांच्या मार्गदर्शनाखालीच आज गेवराई तालुक्यातील रूई गाव महिण्याकाठी जवळपास साडे तीन कोटी रूपये तूतीतून कमवित आहे, सीईओंनी केलेल्या मार्गदर्शनानुसार येथील सरपंच कालिदास नवले यांनी तसे काम उभा केले आहे. याची दखल सध्या देशही घेत आहे.  

सीईओ श्रीकृष्ण, कर्ण अन् भिमाप्रमाणे लढले
सीईओ अजित पवार यांनी दोन वर्ष कसे काम केले यावर अधिकार्‍यांनी आपआपले मनोगत व्यक्त केले, झेडपीचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी वासूदेव सोळंके आणि लेखाधिकारी श्री. जटाळ यांनी तर सीईओ अजित पवार प्रत्येक कामात कसा षटकार मारायचे हे उदाहरणासह सांगितले. जो कोणी त्यांच्याकडे गेला त्याला त्यांनी कर्णाप्रमाणे मदत केली, झेडपीत श्रीकृष्णाप्रमाणे सारथ्याचे काम केले तर भ्रष्टाचार करणार्‍यांच्या विरोधात एका भिमा प्रमाणे ते लढल्याचेही यावेळी अधिकार्‍यांनी आपल्या वाणीतून सांगितले.

बीडसाठी कलेक्टरशिप सोडली…
तर शिर्डी देशात पहिल्या क्रमांकावर आणेल
मागच्या पाच महिण्यांपुर्वीच त्यांना धाराशिव येथे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्तीचे आदेश मिळणार होते, मात्र त्यांनी शासनाला ‘नो’ असे उत्तर कळविले. कारण बीड सारख्या जिल्ह्यात काम करण्यास मोठा वाव आहे, आणि त्यांनी तेच काम जिल्ह्यात उभा करून दाखविले. आता जर सरकारने मला शिर्डीची जबाबदारी दिली तर शिर्डी देशात पहिल्या क्रमांकावर आणेल, असा विश्‍वासही त्यांनी यावेळी बोलून दाखविला.

Exit mobile version