दिल्ली (वृत्तसेवा): गेले साडेपाच महिने राज्यसभेतून निलंबीत असलेल्या काँग्रेसच्या राज्यसभा खासदार रजनीताई पाटील यांचे निलंबन अखेर मागे घेण्यात आले आहे.
खा.रजनीताई पाटील यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राष्ट्रपती अभिभाषणावर चर्चेस उत्तर देण्याच्या भाषणावेळी सभागृहात सुरू असलेल्या गोंधळाचे व्हिडिओ चित्रण केले, ते सोशल मिडियावरही व्हायरल झाले. नंतर भाजप खासदार जी.व्ही.एल. नरसिंहराव यांनी पाटील यांच्याबद्दल त्वरीत तक्रार केली व अर्थसंकल्पीय अधिवेशनात 10 फेब्रुवारी रोजी पाटील यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती .गेली दोन अधिवेशने त्या सभागृहाबाहेर आहेत. पाटील यांना निलंबीत करण्याचा निर्णय राज्यसभा सभापतींनी घेतला होता. काँग्रेसच्या राज्यसभा खासदार रजनीताई पाटील यांचे निलंबन अखेर मागे घेण्यात आले आहे.