Site icon लोकाशा-बंब न्यूज

मुगगावमध्ये तीन मुलांच्या आईचा सरपंचांना लागला लळा, अंमळनेर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल, पिडीतेच्या पतीला जिवे मारण्याची सरपंच यांची धमकी

अंमळनेर (लोकाशा न्युज) पाटोदा तालुक्यातील अंमळनेर पोलीस ठाणे हद्दीतील मुगगावमध्ये सरपंच यांचे एका महिले सोबत गुप्त गू .. असल्याची फिर्याद पिडीत महिलेच्या पतीनेच अंमळनेर पोलीस ठाण्यात दिलेली असल्यामुळे सरपंचांनाच तीन मुलांच्या आईचा लळा लागला असल्यामुळे आठेगाव पुठ्यात या घटनेची मोठी चर्चा होऊ लागली आहे .

अंमळनेर पोलीस ठाणे हद्दीत असलेल्या मुगगाव येथे शेती करुन एक कुटूंब आपली उपजिवीका भागवत असतांना दि २/८/२०२३ रोजी पिडीत महिला (आसु )नाव बदलले आहे हि कोणाला काहीही न सांगता शेतात निघून गेली होती व ती दोन दिवसांपासून सापडत नव्हती. यामुळे तिचे व गावातील संजय गोरख खोटे सरपंच यांचे लफडे चालू असल्याची कुणकूण पिडीत महिलेचे पती यांना लोकांकडून लागली होती.

त्यामुळे याचा जाब विचारण्यासाठी सदरील महिलेचे पती व पिडीत महिलेच्या पतीचे मामा असे दि.पाच ऑगस्ट रोजी सकाळी आठ वाजता मुगगाव गावातील चौकात सरपंच संजय खोटे यांच्याकडे गेले होते त्यावेळी पिडीतेचे पती हे संजय खोटे यांना म्हणाले कि माझी बायको हि परवा पासून गायब आहे तिच्याबद्दल तुला काही माहित आहे का ? असे विचारले असता संजय खोटे मला मनाला तुझ्या बायकोचे आणि माझे लफडे आहे ? तू जर आमच्या दोघांच्या मध्ये आडवा आलाच तर तुझे हात पाय तोडून तुझा काटा काढीन ? असे म्हणून माझ्या गचुऱ्याला धरून तोंडात चापटा मारून लाथा बुक्क्या घालून खाली पाडले व मला म्हणाला यापुढे जर माझ्या नादाला लागला तर तुला खाल्लास करून टाकीन अशीही धमकी दिल्याची फिर्याद पिडीत महिलेच्या पतीने अंमळनेर पोलीस ठाण्यात दाखल केलेली असुन या प्रकरणाचा पुढील तपास अंमळनेर पोलीस ठाण्याचे कर्तव्यदक्ष सहाय्यक पोलीस निरीक्षक चंन्द्रकांत गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार सुग्रीव गर्जे हे करत आहेत .

मुगगावमध्ये चक्क सरपंचांनीच महिलेच्या अब्रुवर हात घातला असल्याचा प्रकार समोर आलेला असल्यामुळे सरपंच यांची तर पुरती गेलीच परंतू याच बरोबर गावाची देखील अब्रु वेशिला टांगली असल्यामुळे सध्या या प्रकाराची मोठी चर्चा आठेगाव पुठ्यात रंगू लागली आहे.

आरोप खोटेच..
भविष्यात सरपंच ,पंचायत समिती ,जिल्हा परिषद पदासाठी मी दावेदार असल्यामुळे माझे अस्तीत्व संपविण्यासाठी विरोधकांनी हे कुंभाड रचले असुन .माझ्यावर केलेले आरोप हे खोटेच असुन घटनेच्या वेळी आपण गावात देखील नव्हतो यामुळे लवकरच दूध का दूध पाणी का पाणी या गोष्टी समोर येथील अशी प्रतिक्रीया मुगगावचे सरपंच संजय खोटे यांनी दैनिक लोकाशाशी बोलतांना दिली.

_चौकट

आठेगाव पुठ्ठा नेहमीच चर्चेत ..

आठेगाव पुठ्ठा हा नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत राहत आहे .प्रत्येक वेळी बाईंच्या प्रकरणावरुनच हा परिसर चर्चेत येत आहे. संत महासंत यांची चर्चा थांबायचे नाव घेत नाही तोच सरपंचांना यांना देखील बाईचा लळा लागला असल्याचा प्रकार समोर आला आहे.

_चौकट

मुगगावचे सरपंच नेहमीच चर्चेत …

मुगगावचे सरपंच यांना तडीपार देखील करण्यात आले होते त्यामुळे काही महिने ते अंतर जिल्हा वास्तव्यास होते .कुठे हे प्रकरण शांत होत नाही व काही वर्ष लोटत नाही तोच परत सरपंच यांच्यावर बालंट आले असल्यामुळे मुगगावचे सरपंच अन् चर्चा हे काही थांबायचे नाव घेत नाही.

Exit mobile version