बीड, दि. 3 (जि. मा. का.) : शेतकरी आस्मानी किंवा सुलतानी संकटानी हतबल होतो. या संकटातुन बाहेर पडण्याचा कुठलाच मार्ग सापडत नाही त्यावेळी तो आत्महत्या करण्याला प्रवृत्त होतो. कुंटूंब प्रमुख निघुन गेल्यामुळे कुंटूंबांत खचून जाते,घरची परिस्थिती कशी हाताळावी हे सूचत नाही.या बिकट प्रसंगी खचून न जाता घरातील कर्त्या महिला किंवा पुरुषाने एक पाऊल पुढे टाकून शेतीपुरक व्यावसायासाठी शेळी, मेंढी, गाय, म्हैस पालनासाठी,विहीर किंवा शेततळयासाठी प्रशासनाकडे कर्जाची मागणी करावी, प्रशासन आपल्या मदतील हात देईल असे प्रतिपादन जिल्हाधिकारी दिपा मुधोळ-मुंडे यांनी केले.
महसूल सप्ताहानिमित्त महसुल मंत्री यांच्या संकल्पनेतुन एक हात मदतीचा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात आयोजित कार्यक्रमा प्रसंगी त्या बोलत होत्या.
यावेळी जिल्हाधिकारी म्हणाल्या की, संकटकाळी अनेक मार्ग बंद झाले तरी एखादा तरी मार्ग आपणास प्रयत्नामुळे नक्कीच सापडतो. आपल्या कुंटूंबातील पाल्याचे पालन पोषण व भविष्य घडविण्यासाठी आपण बँकाकडे कर्ज प्रस्ताव सादर करावेत असेही जिल्हाधिकारी मुंडे यांनी सांगितले.
या कार्यक्रमास जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार, निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी,उपविभागीय अधिकारी ओंकार देशमुख, तहसीलदार सुरेंद्र डोके, नायक तहसीलदार श्री. काळे आत्महत्याग्रस्त शेतक-याचे कुंटुंब, संजय गांधी आणि श्रावणबाळ योजनेचे लाभार्थी उपस्थित होते.
महसुल सप्ताहानिमित्त एक हात मदतीचा या कार्यक्रमात जिल्हाधिकारी दिपा मुधोळ-मुंडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी, तहसीलदार सुरेंद्र डोके यांच्या हस्ते संजय गांधी निराधार योजना शहरी भागातील 7 लाभार्थी, ग्रामीण भागातील 7 लाभार्थी आणि आत्महत्याग्रस्त शेतक-याच्या 18 कुंटूंबातील व्यक्तीना धनदेशाचे वाटप करण्यात आले तसेच महसुल मधील रेकार्ड दुरुस्ती 1966 कलम 155 प्रमाणे एक मंजूरी आदेश वाटप करण्यात आला. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन नागरगोजे यांनी केले.