Site icon लोकाशा-बंब न्यूज

खा. डॉ. प्रीतमताई मुंडे यांच्या पाठपुराव्यामुळे अमृत भारत योजनेअंतर्गत परळी वैजनाथ रेल्वे स्थानकाचे रूप पालटणार, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन उद्घाटन


परळी वैजनाथ
बीड जिल्ह्यच्या खा. डॉ. प्रीतमताई मुंडे यांच्या पाठपुराव्यामुळे केंद्र सरकारच्या अमृत भारत योजनेअंतर्गत परळी वैजनाथ रेल्वेस्थानकाच्या पुनर्विकास होणार आहे. रविवार, 6 ऑगस्ट रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या हस्ते या कामाचे ऑनलाईन उद्घाटन करण्यात येणार आहे. त्यामुळे आता परळी वैजनाथ रेल्वे स्थानकाचे रूप पालटणार आहे. या कार्यक्रमाच्या पूर्वतयारीसाठी भारतीय जनता पक्षाच्या शिष्टमंडळाने साऊथ सेंट्रल रेल्वेचे अपर मंडळ प्रबंधक राजीव कुमार गंगेले यांची भेट घेतली.
अमृत भारत स्थानक योजनेअंतर्गत देशभरातील अनेक रेल्वे स्टेशनचा चेहरा मोहरा बदलला जाणार आहे. सदरील योजनेत परळी वैजनाथ रेल्वेस्थानकाचा समावेश करावा यासाठी रेल्वे मंत्रालयाकडे खा. प्रीतमताई मुंडे यांनी सतत पाठपुरावा केला. या योजनेत आता परळी वैजनाथ रेल्वे स्थानकाचा समावेश करण्यात आला आहे. रविवार 6 ऑगस्ट रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन उद्घाटन केले जाणार आहे. या कार्यक्रमाच्या पूर्वतयारी साठी बुधवार दि 2 ऑगस्ट रोजी भाजपा तालुका अध्यक्ष सतीश मुंडे, शहर अध्यक्ष जुगलकिशोर लोहिया, अश्विन मोगरकर, नितीन समशेट्टे, स्वीय्य सहाय्यक राजेंद्र लोढा यांनी साऊथ सेंट्रल रेल्वेचे अपर मंडळ प्रबंधक राजीव कुमार गंगेले यांची भेट घेतली. या भेटीत चर्चा करून कार्यक्रमाची रूपरेषा ठरवण्यात आली.
रेल्वेस्थानकांचा पायाभूत विकास करण्यावर या योजनेत भर देण्यात आला आहे. त्यासाठी दीर्घकालीन विकास आराखडा यापूर्वीच तयार करण्यात आला आहे. स्थानकांचा विकास करताना दररोज स्थानकावर येणारी सरासरी प्रवासी संख्या लक्षात घेवून नियोजन करण्यात आले आहे. एकंदरीत प्रवासी केंद्रीत सुविधा स्थानकांवर विकसित करण्यावर भर दिला जाणार आहे. स्थानकाच्या बाह्यरूपासोबतच अंतर्गत भागातही सुधारणा करण्याची तरतूद या योजनेत असणार आहे.
या उदघाटन कार्यक्रमाच्या तयारीसाठी विशेष रेल्वेने साऊथ सेंट्रल रेल्वेचे अपर मंडळ प्रबंधक राजीव कुमार गंगेले परळी येथे आले होते. यावेळी चर्चा करण्यासाठी भाजपा तालुका अध्यक्ष सतीश मुंडे, शहर अध्यक्ष जुगलकिशोर लोहिया, अश्विन मोगरकर, नितीन समशेट्टे, खा. प्रीतमताई मुंडे यांचे स्वीय्य सहाय्यक राजेंद्र लोढा उपस्थित होते.

Exit mobile version