Site icon लोकाशा-बंब न्यूज

पंकजाताई मुंडे यांचा वाढदिवस परळीत सामाजिक सेवा उपक्रमांनी होणार साजरा, मोफत आधारकार्ड अपडेट कॅम्प, सुकन्या समृद्ध योजनेचे पासबुक वितरण, रेनकोट वाटप, वृक्षारोपण आदी कार्यक्रमांचं आयोजन

परळी वैजनाथ ।दिनांक २४।
भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांचा वाढदिवस भाजपच्या वतीनं विविध सामाजिक उपक्रम राबवून साजरा करण्यात येणार आहे. मोफत आधारकार्ड अपडेट कॅम्प, सुकन्या समृद्धी योजनेचे पासबुक वितरण, रेनकोट वाटप, वृक्षारोपण आदी कार्यक्रमांचं आयोजन यादिवशी करण्यात आलं आहे.

पंकजाताई मुंडे यांचा येत्या २६ जुलै रोजी वाढदिवस आहे. राज्यातील अतिवृष्टी आणि शेतकऱ्यांवर आलेलं संकट लक्षात घेऊन वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय पंकजाताईंनी घेतला आहे. तथापि भाजपच्या वतीनं त्यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रम राबवून साजरा करण्याचे ठरवले आहे. त्या अनुषंगाने २६ जुलै रोजी सकाळी ७ वा. – प्रभू वैद्यनाथास अभिषेक, ८ वा. मेरू गिरी डोंगरावर वृक्षारोपण, सकाळी ८.३० वा. मलिकपुरा येथे दाऊद अली शहाबाबा दर्गा येथे चादर अर्पण, ९ वा. भीमनगर सुगंध कुटी, बुध्द विहार, जगतकर गल्ली येथे बुध्दवंदना, ९.३० वा. उप जिल्हा रूग्णालयात रूग्णांना फळ वाटप, सकाळी १० ते ११ वा. अरूणोदय मार्केट मधील संपर्क कार्यालय येथे आधार अपडेट कॅम्पचे उदघाटन, सुकन्या समृध्दी योजनेचे पासबुक वितरण,वृत्तपत्र वितरकांना रेनकोट वाटप तसेच सकाळी ११ वा. विविध शाळांमध्ये शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात येणार आहे. सर्व पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी वरील सर्व ठिकाणी बहुसंख्येने सहभागी व्हावे असं आवाहन भाजपच्या वतीनं करण्यात आलं आहे.
••••

Exit mobile version