
सिरसाळ्यात दोन कारचा समोरासमोर अपघात
शिर्डी ला जाणारे आंध्र प्रदेशातील कुटुंब गंभीर जखमी
सिरसाळा : सिरसाळ्यातील तेलगाव रोडवर दोन करचा समोरासमोर अपघात होऊन शिर्डी ला जाणारे आंध्र प्रदेशाचे कुटुंबातील व्यक्ती गंभीर जखमी झाले आहेत. हि घटना आज दिनांक १९ रोजी दुपारी ३ : ३० मिनिटांनी घडली आहे.
आंध्र प्रदेशातील एक कुटुंब एपी २७ सिजी १४५९ ह्या ब्रिजा कंपनी च्या गाडीतून परळी-सिरसाळा मार्गे शिर्डी कडे जात होते. सिरसाळ्यात तेलगाव रोडच्या वळणी रस्त्यात पुण्या कडून आलेली कार एम एच १२ पिएन ७६७५ ह्या कारशी समोरासमोर धडक होऊन अपघात झाला.यात आंध्र प्रदेशातील एक महिला,दोन मुली,एक पुरूष गंभीर जखमी झाला आहे. अपघात एवढा भिषण होता कि, दोन्ही गाड्या एकमेकांना धडकून चुरा झाल्या आहेत. घटनास्थळी सिरसाळा पोलीस स्टेशन चे सपोनि संदिप दहिफळे यांनी पोलीस कर्मचारी मुंडे, मेंडके,पोकळे,सय्यद, जेटेवाड यांना पाठवले, पोलीसांनी तात्काळ पोहचत स्थानिक नागरिकांच्या सहाय्याने जखमींना उपचारार्थ दवाखान्यात हलवले आहे. या वेळी स्थानिक उपस्थित घटनास्थळी असलेले नागरिकांनी देखील आपली माणूसकी दाखवत जखमींना मदत केली आहे. प्रा.अमोल लव्हाळे यांनी देखील जखमींना उपचारार्थ दाखल करण्यासाठी मदत केली आहे.
