Site icon लोकाशा-बंब न्यूज

बीडमध्ये अकरावीच्या विद्यार्थिनीची आत्महत्या

बीड – येथील शिवाजी धांडे नगर मध्ये किरायाने रूम करून राहणाऱ्या मुलीने ओढणीच्या सहाय्याने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी १० च्या सुमारास घडली. ती ११ वीचे शिक्षण घेत असल्याचे सांगितले जात आहे.

शहरातील शिवाजी धांडे नगर भागातील निकीता रेनाजी भोसले (वय-१७) रा.भवानवाडी ता.बीड असे त्या आत्महत्या केलेल्या मुलीचे नाव आहे. ती यावर्षी ११ वीच्या वर्गात शिक्षण घेत होती. आज सकाळी १० च्या सुमारास ओढणीच्या सहाय्याने रूममध्ये गळफास घेवून आत्महत्या केल्याचे उघडकीस आले. यावेळी घटनास्थळी शिवाजीनगर ठाण्याचे राडकर यांनी भेट देवुन पंचनामा केला. सदरील विद्यार्थीनीने आत्महत्या का केली ? याचे कारण अद्याप समजू शकले नाही.

Exit mobile version