बीड, दि. 3 (लोकाशा न्यूज) : येथील स्थानिक गुन्हेचे निरीक्षक सतीश वाघ यांची आठवडाभरापूर्वीच छत्रपती संभाजीनगर येथे बदली झाली होती. त्यानंतर बीड स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिस निरीक्षक पदी संतोष साबळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या बदलीचे आदेश पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी सोमवारी (दि.3) काढले आहेत. तर त्यांच्या जागी बीड ग्रामीण पोलिस ठाण्याच्या ठाणेदार पदी विश्वास पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
अखेर स्थानिक गुन्हे शाखेची जबाबदारी संतोष साबळेंच्या हाती, एसपींनी सोपवला कायमचा पदभार,बीड ग्रामीण ठाण्याच्या पोलिस निरीक्षक पदी विश्वास पाटील तर वाहतूक शाखा अशोक मुदिराजांकडे
