Site icon लोकाशा-बंब न्यूज

बीडचे आमदार संदिप क्षीरसागर शरद पवारांसोबत राहणार, आ. क्षीरसागर यांनी स्पष्ट केली भूमिका


बीड : राजकारणामध्ये ज्या व्यक्तीने मोठे केले त्या व्यक्तीला कधीच विसरायचे नसते परंतु सध्याचे राजकारण अस्थिर बनले असून ज्यांनी आपल्यासाठी खूप काही केले त्याचा विसर अनेकांना पडतो, परंतु बीड मतदार संघाचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी त्यांची भूमिका स्पष्ट करत. शरद पवार यांच्यासोबत राहणार असल्याची सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. या पोस्टमुळे आमदार संदीप क्षीरसागर यांची भूमिका समजल्यानंतर त्यांच्या भूमिकेला सोशल मीडियावर चांगला प्रतिसाद मिळत असून त्यांनी घेतलेल्या निर्णयाचे स्वागत होत आहे.

Exit mobile version