Site icon लोकाशा-बंब न्यूज

सुट्टीवर आलेल्या सीआरपीएफ जवानांचा अपघातात मृत्यू

कोळगाव, (बाळासाहेब घाडगे) – गेवराई तालुक्यातील उक्कडप्रिंपी येथील फौजी बाबासाहेब भागवत पवार हे गेवराई कडे जात असताना पाडळसिंगी येथील पेट्रोल पंप जवळ समोर येणाऱ्या वाहनांने अचानक धडक दिल्याने बाबासाहेब भागवत पवार यांचा मृत्यू झाला. ही घटना दि.०१ जूलै रोजी दुपारच्या सुमारास घडली.

गेवराई तालुक्यातील उक्कडप्रिंपी येथील भूमिपुत्र सीआरपीएफ जवानांच्या सेवेत जम्मू काश्मीर येथे मागील काही वर्षांपासून कार्यरत होते. दरम्यान दोन दिवसांपूर्वी सुट्टीवर आपल्या जन्मगावी आले होते. दि.०१ जूलै रोजी गेवराई येथील नातेवाईकांना भेटण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक-६१ वरून मादळमोही पाडळसिंगी कडे जात असताना पाडळसिंगी येथील पेट्रोल पंप जवळ समोर येणाऱ्या वाहनांने अचानक धडक बसली. तसेच असे ही सांगितले जाते की खाली पडल्यावर मागून येणाऱ्या दुसऱ्या एका वाहनाने परत धडक बसली. यामध्ये बाबासाहेब भागवत पवार हे गंभीर जखमी झाले. मोठ्या प्रमाणावर रक्तस्राव होत असल्याने रूग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना दि.०१ जूलै २०२३ रोजी दुपारच्या सुमारास घडली. याविषयी गेवराई पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती.

दोन्ही ही जवान भाऊभाऊ अपघातात दुदैवाने मृत्यू..

वर्षाभर पूर्वी याचा भाऊ तो पण नगर ला मोटार सायकल वर ड्युटीला जात असतांना पाथर्डी जवळ मोटार सायकल स्लिप होऊन अपघात होऊन मयत झाला होता. तोही भारतीय सैन्य दलात कार्यरत होता. या दुदैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Exit mobile version