Site icon लोकाशा-बंब न्यूज

सरकारने कर्तव्यदक्ष अधिकार्‍याच्या हातात दिली मराठवाड्याची धुरा, छत्रपती संभाजी नगरचे जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांच्याकडे सोपवला आयुक्त पदाचा अतिरिक्त पदभार


बीड, दि. 30 (लोकाशा न्यूज) : छत्रपती संभाजी नगरचे जिल्हाधिकारी अस्तिककुमार पाण्डेय हे कर्तव्यदक्ष अधिकारी आहेत. त्यांच्या कर्तव्यदक्षपणा लक्षात घेवूनच सरकारने त्यांच्याकडे मराठवड्याची धुरा सोपविली आहे. छत्रपती संभाजी नगरच्या आयुक्त पदाचा अतिरिक्त पदभार त्यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.
छत्रपती संभाजी नगरच्या आयुक्त पदावर सुनिल केंद्रेकर होते, आपल्या कामातून त्यांनी एक वेगळी ओळख निर्माण केलेली आहे. मात्र मुदत संपण्यापुर्वीच ते शासकिय सेवेतून सेवानिवृत्त झाले आहेत. तीन जुलैपासून त्यांनी भारतीय प्रशासन सेवेतून स्वेच्छा सेवानिवृत्ती घेतली आहे. परिणामी प्रशासकिय कारणास्तव आयुक्त पदाचा अतिरिक्त पदभार छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी अस्तिक कुमार पाण्डेय यांच्याकडे देण्यात आली आहे. याबाबत शुक्रवारी राज्याचे सह सचिव डॉ. माधव वीर यांनी पत्र काढले आहे. आस्तिककुमार पाण्डेय हे खरोखरच एक कर्तव्यदक्ष अधिकारी आहेत. त्यांनी यापुर्वी बीड जिल्ह्यात जिल्हाधिकारी म्हणून चांगले काम केलेले आहे. त्यांनी आपल्या कामातून बीड कराचे अनेक प्रश्‍न सोडविलेले आहेत. त्यामुळे ते आयुक्त पदाच्या माध्यमातूनही चांगल्याप्रकारे काम करून नागरिकांचे प्रश्‍न तात्काळ सोडवितील असा विश्‍वास व्यक्त केला जात आहे.

Exit mobile version