पाटोदा : लोकाशा न्यूज
पाटोदा तालुक्यातील कुसळंब येथील दोन शेतकऱ्यांमध्ये शेतीत जाणाऱ्या रस्त्याच्या मुद्द्यावरून वाद झाला त्या ठिकाणी शेतकरी गोरख अजिनाथ पवार या शेतकऱ्याच्या डोक्यात दगड लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.
कुसळंब येथील शेतकरी संतोष आजिनाथ पवार रावसाहेब आजिनाथ पवार यांच्यात व शेतकरी गोरख आजिनाथ पवार यांच्यामध्ये शेतात जाणाऱ्या रस्त्यावरून वात सुरू झाला त्या ठिकाणी गोरख आजिनाथ पवार यांच्या डोक्यात दगड लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला आणि कुसळंब सह परिसरात खरबळ उडाली पोलिसांना माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोच झाले व पुढील तपास सुरू आहे. तसेच संतोष आजिनाथ पवार व रावसाहेब अजिनाथ पवार यांना ताब्यात घेतल्याची सुद्धा माहिती मिळाली असून उशिरापर्यंत गुन्हा नोंद झाल्याची माहिती हाती आली नाही..
