Site icon लोकाशा-बंब न्यूज

ग्रा. पं. सदस्य राहुल नखाते यांना आजीशोक


बीड, दी. 25 : आवरगाव (त्ता. धारूर) येथील ज्येष्ठ नागरिक मुक्ताबाई धोंडीराम नखाते यांचे रविवारी सकाळी ७.१५ वाजता राहत्या घरी निधन झाले, मुर्तिव समयी त्यांचे वय ८५ वर्ष होते, त्या धार्मिक वर्तीच्या आणि कुटुंबातील सर्वांना सोबत घेऊन चालणाऱ्या होत्या, सकाळी साडे दहा वाजता आवरगाव येथील शेतात त्यांच्या पार्थिवावर अंत्यविधी करण्यात आला. आवरगाव ग्राम पंचायतीचे सदस्य राहुल नखाते यांच्या त्या आजी होत. त्यांच्या पश्चात पती, दोन मुलं, दोन सूना, एक मुलगी, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे, मंगळवारी सकाळी आठ वाजता सावडन्याचा कार्यक्रम होणार आहे. त्यांच्या अशा अचानक जाण्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. नखाते कुटुंबियांच्या दुःखात दैनिक लोकाशा परिवार सहभागी आहे.

Exit mobile version