परळी वैजनाथ दि २३ (लोकाशा न्युज) :- परळी शहरातील बरकत नगर भागात काल दोन गटात झालेल्या तुंबळ हाणामारीत तुफान राडा झाला होता. हाणामारी धारदार शस्त्राचा वापर करण्यात आला यामध्ये एक जण ठार झाल्याची खळबळजनक घटना भागात घडली होती. ह्या प्रकरणी संभाजीनगर पोलीस ठाणे परळी तालुक्यातील नागापूर येथील सहा आरोपींविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल झाला असून अद्याप कोणासही अटक करण्यात आलेले नाही सर्वच्या सर्व आरोपी फरार आहेत.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, काल शहरातील बरकत नगर भागात मुस्लिम समाजाचे लग्न होते. सदर लग्नास परळी तालुक्यातील नागापूर येथील त्यांचे नातेवाईकही आले. लग्न आटोपल्यानंतर नागापूरच्या दोन नातेवाईकांत शाब्दिक चकमक झाली त्याचे पर्यव्यसन तुंबळ हाणामारीत झाले होते. प्राप्त माहितीनुसार मयत अलाउद्दीन शेख याची नागापूर चौकात पान टपरी आहे. दुसरे नातेवाईक त्यांना येता जाता पैशाची मागणी करीत असत आणि शेख अलाउद्दीन देतही होते. मात्र दिनांक २२/०६/२०२३ रोजी परळीच्या लग्नात दोघात बाचाबाची झाली ज्यावेळी नागपूरच्या दोन नातेवाईकात बाचाबाची सुरू झाली होती त्यावेळी या ठिकाणच्या सामाजिक कार्यकर्त्यांनी आणि त्यांच्या नातेवाईकांनी भांडणे सोडवण्याचा प्रयत्न केला मात्र नागापूरचे दुसरे नातेवाईक आरोपी मेहबूब पठाण, शरीफ पठाण, शाहरुख पठाण, तोफिक पठाण, सुरज पठाण, सलमान पठाण धारदार शस्त्रासह दाखल झाले आणि त्यांनी शेख अलाउद्दीन यांच्यावर कोयते आणि तलवारीने हल्ला चढवला हल्ल्यात त्यांचे वर शस्त्राचे वार केले असल्यामुळे शेख अलाउद्दीन यांचे निधन झाले. सदरची घटना घडली त्यावेळी संभाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सलीम चाऊस, सहाय्यक पोलीस निरीक्षक महेंद्रसिंग ठाकूर, पोलीस उपनिरीक्षक चंद्रया ऐटवार, पोलीस बालासाहेब चव्हाण, शत्रुघ्न शिंदे, समाधान भाजीभाकरे, अर्जुन मस्के, राहुल सेफ घटनास्थळी दाखल झाले आणि ठोस कारवाई केल्याने पुढील अनर्थ टळला.
दरम्यान याप्रकरणी मयताचा मुलगा समीर अलाउद्दीन शेख वय १८ या नागापूर या परळी याच्या फिर्यादीनुसार वरील सहाही आरोपी विरुद्ध कलम ३०२, ३०७, ३४१, १४३, १४७, १४८, १४९, भादवीसह ४/२५ भाहका व १३५ म पो कायद्यानुसार गुन्हा दाखल झाला असून सर्वच्या सर्व आरोपी फरार आहेत अधिक तपास पोलीस निरीक्षक सलीम चाऊस करीत आहेत.
परळीतील हत्या प्रकरणी सहा आरोपींविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल; संभाजीनगर पोलीस ठाण्यात झाला गुन्हा दाखल, सर्व आरोपी फरार
