Site icon लोकाशा-बंब न्यूज

बीडमध्ये तेरा तासात दगावले एवढे कोरोना रुग्ण

बीड, दि.12 (लोकाशा न्यूज) : कोरोना रूग्णांच्या वाढत्या संख्ये बरोबरच कोरोना रूग्णांच्या मृत्यूचेही प्रमाण वाढत असल्याचे चिंतेचे वातावरण आहे. अत्यावस्थ झालेल्या कोरोना रूग्णांवर अंबाजोगाईतील स्वाराती रूग्णालयात उपचार करण्यात येतात. मंगळवारी रात्रीपासून अवघ्या १३ तासात सहा कोरोना रूग्णांचा स्वाराती रूग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. यात तीन पुरूष आणि तीन महिला रूग्णांचा समावेश असून ते अंबाजोगाई, परळी आणि केज तालुक्यातील आहेत. वाढत चाललेली ही संख्या रोखण्यास जिल्हा आरोग्य यंत्रणेकडून शर्तीचे प्रयत्न केले जात आहेत.

Exit mobile version