वडवणी : सतत सामाजिक कार्यकर्त्या आग्रेसर आसणार्या कानिफनाथ बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या अध्यक्ष सौ.ऐश्वर्याताई जयसिंह भैय्या सोळंके यांनी वडवणी तालुक्यातील दोन व धारुर तालुक्यातील एका कुटुंबातील करता व्यक्ती गेल्याने कुटुंब अक्षरशा उघड्यावर पडले होते.त्यां कुटुंबाची प्रत्यक्षन भेट घेऊन काळजी करू नका आम्ही आहोत तुमच्या समवेत अस म्हणत कुटुंबाला धिर देत सांत्वन केले आर्थिक मदत देऊन त्या कुटुबीयांना आधार दिला आहे.
सविस्तर वृत्त असे की माजलगाव मतदार संघामध्ये सामाजिक कार्यात अग्रेसर आसणार्या सौ.ऐश्वर्याताई जयसिंह सोळंके यांनी कानिफनाथ बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या माध्यमातुन गोरगरीब दिन दुबळ्यांची सेवा त्यांच्या हातून घडत आहे.यामध्ये नेत्र रोगनिदान शिबीर गरजु वयोवृद्धांचे डोळ्यांचे ऑपरेशन,स्त्रीयांचे सर्व रोग निदान शिबीर,
महिलांना त्यांच्या पायावर उभा करण्यासाठी स्वयं रोजगार शिबीरात उद्योग यात शिलाई मशीन वाटप आर्थिक मदत करून वेळोवेळी मदत करत आसतात.
माजलगाव मतदार संघात ग्रामीण भागातील महिलांच्या आरोग्याविषयक प्रश्नांवर भरीव कार्य
करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या ऐश्वर्याताईंच्या कार्याची दखल थेट महाराष्ट्र राज्याचे
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली आहे.त्यांचा प्रशस्ती पत्र देऊन सन्मान केला होता.पिंपरखेड येथील ऊसतोड मजुर संदीपान अर्जुनराव साबळे यांचे सोलापूर जवळ अपघाती निधन झाले होते. ऐश्वर्याताईंनी साबळे कुटुंबाची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांनी त्यांचे सात्वन केले.त्या कुटुंबाला अर्थसहाय्य देऊन आधार दिला.देवडी येथील गणेश परमेश्वर राऊत यांचे अपघाती निधन झाले होते.त्यांच्या कुटुंबातील करता व्यक्ती गेल्याने त्यांचे कुटुंब उघड्यावर पडले होते.त्यांच्या कुटुंबीयांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांचे सांत्वन करून त्यांनाही आर्थिक मदत दिली.धारूर तालुक्यातील बडगळ तांडा येथील ऊसतोड मजुर विनोद राठोड यांचे हृदय विकाराच्या तिवृ झटक्याने निधन झाले होते.त्यांच्या कुटुंबांचे सांत्वन ऐश्वर्याताईंनी प्रत्यक्ष भेट घेऊन आर्थिक मदत केली व काळजी करू नका झालेल्या गोष्टीचा जास्त विचार करू नका आम्ही आहोत तुमच्या सोबत असे म्हणत कुटुंबाला धिर देत आर्थिक मदत देऊन अनाथ कुटुंबीयांना आधार दिला.त्यांच्या समवेत सौ.रेखाताई विश्वासराव आगे,राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष बजरंग आप्पा साबळे,युवक काँग्रेसचे मा तालुका अध्यक्ष विश्वासराव आगे सरपंच ज्ञानोबा शिंदे, चेअरमन श्रीनिवास भाऊ निपटे आदी उपस्थित होते.
आनाथ कुटुंबीयांना ऐश्वर्याताई जयसिंह सोळंके यांनी दिला आधार, कानिफनाथ संस्थेकडून आनाथ कुटुंबाला आर्थिक मदत
