Site icon लोकाशा-बंब न्यूज

बीडमधील मटका बुक्कींवर एसपींच्या पथकाची छापेमारी, मटका घेणार्‍या नितीन खोड, संतोष भिलारेसह 14 जुगार्‍यांवर गुन्हा दाखल


बीड, दि. 19 (लोकाशा न्यूज) : बीडमधील दोन ठिकाणच्या मटका बुक्यांवर पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांच्या पथकाने छापेमारी करून 12 जुगार्‍यांना रंगेहाथ पकडले विशेष म्हणजे मटका घेणारे नितीन खोड, संतोष भिलारेसह 14 जुगार्‍यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई सोमवारी करण्यात आली.
सोमवारी दुपारी 15.45 वाजताच्या दरम्यान बीडमध्ये गौरव हॉटेलच्या बाजूला, यशराज हॉटेल येथे छोट्या पत्र्याच्या उघड्या टपरीमध्ये मटक्याचा अड्ड्यावर छापा टाकला, यावेळी चार इसमांना जागीच पकडण्यात आले त्यांच्याकडून 12,500 नगदी रक्कम तसेच मोबाईल व असे एकूण 22,500 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून जागीच मिळून आला. यावेळी निलेश कैलास शिंदे (राहणार वरवटी ता. जि. बीड), श्रीराम देविदास जोगदंड (राहणार वरवटी तालुका जिल्हा बीड), भारत विठ्ठलराव देव तराशे (राहणार लक्ष्मण नगर लेंडी रोड तालुका जिल्हा बीड), रवींद्र रमेश जाधव (राहणार धानोरा तालुका जिल्हा बीड ) असे जागीच कल्याण, मिलन डे नावाचा मटका खेळताना मिळून आले. 4 आरोपी व ज्यांच्या सांगण्यावरून मटका घेतात ते मटका मालक असलेले संतोष भिलारे व नितीन खोड असे 6 आरोपी विरुद्ध कलम 12 (अ) महाराष्ट्र जुगार प्रतिबंध अधिनियम अन्वये शिवाजीनगर पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद करण्यात आला. त्यानंतर दुसरी कारवाई सायंकाळी पावणे पाच वाजण्याच्या दरम्यान बीडमध्ये शिवराज पान सेंटरच्या पाठीमागे जुन्या लक्ष्मी हॉटेलच्या खुल्या गाळयामध्ये करण्यात आली, याठिकाणच्या मटक्याच्या अड्ड्यावर छापा टाकला असता 6 इसमांना जागीच पकडण्यात आले त्यांच्याकडून 10,090 नगदी रक्कम तसेच मोबाईल व असे एकूण 25,090 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आले. यावेळी शिवाजी दिलीप अंकुशेन (रा. आहेर धानोरा ता. जि. बीड), सुभाष एकनाथ चंदनशिव (रा. चर्‍हाटा ता. जि. बीड),विलास रंगनाथ कडवकर (रा. सावंतवाडी ता. जि. बीड),मारुती अण्णासाहेब गोरे (रा. शिवाजीनगर तालुका जिल्हा बीड), कचरू सुखदेव लोंढे (रा. आहेर धानोरा ता.जि. बीड), मोहन रामभाऊ वैद्य (रा. शिवनी ता.जि. बीड) यांना जागीच कल्याण ,मिलन डे नावाचा मटका खेळताना पकडले. त्यांच्या सांगण्यावरून मटका घेतात ते मटका मालक असलेले संतोष भिलारे व नितीन खोड असे 8 आरोपी विरुद्ध कलम 12 (अ )महाराष्ट्र जुगार प्रतिबंध अधिनियम अन्वये शिवाजीनगर पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद करण्यात आला. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाचे प्रमुख सपोनी विलास हजारे, तसेच पथकातील कर्मचारी पोलीस शिपाई सचिन काळे, शिवाजी डीसले, विनायक कडू, यांनी केली आहे.

Exit mobile version