परळी- येथील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमनपदी माजीमंत्री पंकजाताई मुंडे यांची तर उपाध्यक्ष पदी चंद्रकांत कराड यांची बिनविरोध निवड करण्यात आली. याबद्दल त्यांचे सर्वस्तरातून अभिनंदन केले जात आहे.
भाजप नेते स्व गोपीनाथ मुंडे यांनी स्थापन केलेल्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाची निवडणूक नुकतीच जाहिर झाली होती,
मात्र पंकजाताईनी पुढाकार घेऊन सर्व संचालक बिनविरोध काढले होते,
दरम्यान कारखान्याच्या चेअरमन आणि व्हाईस चेअरमन पदासाठी सोमवारी बैठक झाली.यामध्ये पंकजा ताई मुंडे यांची चेअरमन पदी बिनविरोध निवड झाली तर व्हाईस चेअरमन म्हणून चंद्रकांत कराड यांची निवड झाली.या निवडीबद्दल पंकजाताई मुंडे यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.