Site icon लोकाशा-बंब न्यूज

बीडमध्ये गोळीबार, गायकवाड-जाधव गटात मोठा राडा,चौघे जखमी, एसपींनी फौजफाटा सोबत घेवून परिस्थिती नियंत्रणात आणली, आसाराम गायकवाड गजाआड


बीड, दि. 16 (लोकाशा न्यूज) : शुक्रवारी रात्री दहाच्या सुमारास बीडमध्ये गोळीबाराची घटना घडली आहे. यामध्ये दोघांच्या पायाला गोळी लागली आहे. आसाराम गायकवाड आणि सुभाष जाधव या दोन्ही गटात मोठा राडा झाला आहे, दोन्ही गटातील या राड्यात चौघे जण जखमी झाले असून त्यांना उपचारार्थ जिल्हा रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. गोळीबार करायला लावणार्‍या आसाराम गायकवाडला पोलिसांनी गजाआड केले आहे. दरम्यान या घटनेची माहिती मिळताच पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी आपला फौजफाटा सोबत घेवून सदर परिस्थिती नियंत्रणात आणली. त्यामुळे पुढील अनुचित प्रकार टळला.


बीडमधील काही जण कायम दहशत पसरवत शांतता धोक्यात आणण्याचे काम करत आहेत. शुक्रवारी रात्री दहाच्या सुमारास बीडमध्ये शांतता धोक्यात आणण्याची अशीच एक घटना घडली, एकमेकांच्या आक्सातून, पैस्याच्या वादातून आसाराम गायकवाड आणि सुभाष जाधव यांच्या गटात मोठा राडा झाला, शिवाजीनगर हद्दीमधील कालिका नगर भागात आसाराम गायकवाड यांच्या गटाने सुभाष जाधव यांच्या गटावर गावठी कट्ट्याणे गोळीबार केला. यामध्ये जाधव गटाचे गोपाळ भिसे पाटील आणि मणिराम गायकवाड यांच्या पायाला गोळी लागली आहे. तर या राड्यात गायकवाड गटाचे मारोती जगन्नाथ गायकवाड याच्यासह अन्य एक जखमी झाला आहे. घडलेल्या या घटनेची माहिती डॉ. लक्ष्मण जाधव यांनी पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांना दिली,

त्यानंतर पोलिस अधीक्षकांसह अप्पर पोलिस अधीक्षक सचिन पांडकर, डीवायएसपी संतोष वाळके, एलसीबीचे सतिश वाघ, पोलिस निरीक्षक केतन राठोड, रवि सानप, संतोष साबळे, पेठ बीडचे पवार हे आपला ताफा घेवून घटनास्थळाबरोबरच जिल्हा रूग्णालयात दाखल झाले, त्यामुळे चिघळलेली परिस्थिती तात्काळ अटोक्यात आली. गोळीबार करणारा आसाराम गायकवाड याला पोलिसांनी अटक केली आहे. जखमींवर सध्या जिल्हा रूग्णालयात उपचार चालू आहेत. दरम्यान या प्रकरणामुळे रात्री उशीरापर्यंत एसपींसह सर्व पोलिस अधिकारी जिल्हा रूग्णालयात तळ ठोकून होते.

Exit mobile version