Site icon लोकाशा-बंब न्यूज

खा. सुप्रिया सुळे NCP च्या नव्या कार्यकारी अध्यक्ष, अखेर शरद पवारांनी भाकरी फिरवली

दिल्ली, 10 जून : राष्ट्रवादी काँग्रेसच्या 24व्या वर्धापनदिनी अध्यक्ष शरद पवार यांनी दिल्लीत मोठ्या घोषणा केल्या. प्रफुल्ल पटेल आणि सुप्रिया सुळे यांना कार्यकारी अध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. पक्षाच्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात शरद पवार यांनी ही घोषणा केली.

शरद पवार यांनी वर्धापनदिनाच्या कार्यक्रमात शरद पवार यांनी प्रफुल पटेल आणि सुप्रिया सुळे यांच्याकडे कार्यकारी अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली आहे. याशिवाय सुनिल तटकरे यांनाही पक्षाचे सरचिटणीस केलं आहे. मध्यप्रेदश, गुजरात, राजस्थान, झारखंडची जबाबदारी प्रफुल्ल पटेल यांच्याकडे तर महाराष्ट्र, हरयाणा, पंजाब या राज्यांची जबाबदारी सुप्रिया सुळे यांच्याकडे सोपवण्यात आली आहे.दरम्यान, अजित पवार यांच्यावर कोणतीच जबाबदारी सोपवली नसल्याने त्याची चर्चा सध्या रंगली आहे.

Exit mobile version