Site icon लोकाशा-बंब न्यूज

लाच खाण्याची पण हद्दच झाली !!आठ लाखाची लाच घेताना पुण्याच्या अतिरिक्त आयुक्ताला सीबीआयने पकडले, लाच घेण्यात पुण्याहून बीड पुढे, बीडमध्ये लाचेचा रेट दहा लाखांवर


पुणे, दि. 9 जून : पुण्यामध्ये सीबीआयने मोठी कारवाई करत बड्या आयुक्ताला रंगेहात पकडलं आहे. विभागीय आयुक्त कार्यालयातील अतिरिक्त आयुक्त अनिल रमोड सीबीआयच्या सापळ्यात अडकले आहेत. जमीन परतावा देण्यासाठी लाच स्वीकारताना सीबीआयने अनिल रमोड यांना अटक केली आहे. महसूल विभागात काम करणार्‍या उपायुक्त अनिल रामोड 8 लाख रुपयांची लाच स्वीकारत होते, तेव्हाच सीबीआयने सापळा रचून धाड टाकली. विभागीय आयुक्त कार्यालयात सीबीआयचे अधिकारी दाखल झाले. दरम्यान एवढेच नाही तर बीडमध्ये काही जण दहा दहा लाख रूपयांची लाच खात असल्याची चर्चा सध्या जोरदारपणे सुरू आहे.
प्राथमिक माहितीनुसार हा सगळा व्यवहार हायवेच्या लगत असलेल्या एका जमिनीबाबत होता. नॅशनल हायवेच्या भूसंपादन प्रक्रियेमध्ये लवादाची भूमिका पार पाडणार्‍या अतिरिक्त विभागीय आयुक्त अनिल रामोड यांच्यावर सीबीआयने ही रेड टाकली. अनिल रामोड सातारा, सोलापूर आणि पुणे या तीन जिल्ह्यातील भूसंपादनाच्या अपिलवर निकाल द्यायचे, यात ते भुसंपादनाचा मोबदला वाढून देताना 1 कोटीला 10 लाख मागायचे, असा आरोप ऍडव्होकेट याकूब साहेबू तडवी यांनी केला आहे. तडवी यांनची याबाबत सीबीआयकडे तक्रार दिली होती.

Exit mobile version