Site icon लोकाशा-बंब न्यूज

जिल्हाधिकाऱ्यांच्या दणक्याने 214 ग्राम पंचायत सदस्य अपात्र, मुदतीत जात पडताळणी प्रमाणपत्र सादर न करणे सदस्यांच्या अंगलट आले


बीड, दि. 7 (लोकाशा न्यूज) : जिल्हाधिकारी दिपा मुधोळ ह्या एक धाडसी आणि कर्तव्यदक्ष अधिकारी आहेत, त्यामुळे त्या कोणताही निर्णय तात्काळ आणि गतीने घेतात, मुदतीत जात पडताळणी प्रमाणपत्र सादर न करणार्‍या तब्बल 214 ग्रामपंचायत सदस्यांना त्यांनी काल मोठा दणका दिला आहे. त्यांनी बीड जिल्ह्यातील ह्या 214 ग्रामपंचायत सदस्यांना थेट अपात्र केले आहे. हे सदस्य 2021 मध्ये झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये राखीव जागांवर निवडून आले होते. कलेक्टरांच्या या एका दणक्यामुळे ग्रामपंचायतींमधील वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे. दरम्यान अपात्र झालेल्या सदस्यांमध्ये सर्वच पक्षाच्या प्रमुख पुढार्‍यांचाही समावेश असल्याचे स्पष्ट होत आहे.
ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये राखीव जागांवर निवडून आल्यानंतर 12 महिन्यांच्या आत जात पडताळणी प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक करण्यात आले होते. 2021 मध्ये झालेल्या निवडणुकांमध्ये राखीव जागांवरून निवडणून आलेल्या उमेदवारांना कोरोनामुळे जात पडताळणी प्रमाणपत्र दाखल करण्यास मुदतवाढ देण्यात आली होती. मात्र त्यानंतरही अनेक सदस्यांनी जात पडताळणी प्रमाणपत्र सादर केले नाही. वारंवार संधी देऊनही जात पडताळणी प्रमाणपत्र सादर न केल्याचा अहवाल स्थानिक तहसीलदारांनी दिल्यानंतर जिल्हाधिकरी दीपा मुधोळ-मुंडे यांनी जिल्ह्यातील तब्बल 214 ग्रामपंचायत सदस्यांना अपात्र करण्याचा निर्णय दिला आहे. बीड जिल्ह्यात एकाचवेळी इतक्या मोठ्या प्रमाणावर ग्रामपंचायत सदस्य अपात्र होण्याची ही जिल्ह्याच्या इतिहासातील पहिलीच वेळ आहे.जिल्हाधिकार्‍यांच्या या निर्णयानंतर आता अनेक ग्रामपंचायतींमधील सत्तेचे गणित देखील बदलणार आहे. त्यांच्या या एका निर्णयामुळे आता राजकीय वातावरण ढवळून निघणार आहे.

सत्तेचे गणित बदलणार
काल जिल्हाधिकारी दिपा मुधोळ यांनी 214 ग्रामपंचायत सदस्यांना अपात्र केले. यामुळे आता बर्‍याचश्या ग्रामपंचायतींमधील सत्तेचे गणित बदलू शकते.

कलेक्टरांचा धाडसी निर्णय
जिल्हाधिकारी दिपा मुधोळ ह्या एक कर्तव्यदक्ष अधिकारी आहेत, कोणताही निर्णय त्या गतीने आणि तात्काळ घेतात, चुकारांवर कारवाई तर पीडितांना न्याय देण्याचे काम त्या खर्‍या अर्थाने करत आहेत. कालही त्यांनी 214 ग्रामपंचायत सदस्यांना अपात्र करून मोठी कारवाई केली. एकाचवेळी इतक्या मोठ्या प्रमाणावर ग्रामपंचायत सदस्य अपात्र होण्याची ही जिल्ह्याच्या इतिहासातील पहिलीच वेळ आहे. कलेक्टरांचा हा धाडसी निर्णय असून यामुळे जिल्ह्यातील सर्वच ग्रामपंचायतींमधील राजकिय वातावरण आता ढवळून निघणार आहे.

यांच्यावर झाली अपात्रेची कारवाई

जिल्हाधिकारी दिपा मुधोळ यांनी 214 ग्रामपंचायत सदस्यांना अपात्र केले आहे. यामध्ये वाघमारे द्रोपदी (कोळवाडी), उषा गोरख जाधव (कोळवाडी), पारखे कविता परमेश्वर (काटवटवाडी), पखले दत्तात्रय बाबुराव (पिंपळगाव घाट), कांबळे विद्या सचिन (पिंपळगाव घाट), ढेंबरे महानंदा दौलत (मौजवाडी), निर्मला कुसुम गोरख (करळवाडी/निर्मळवाडी), कोरडे रेवती भूषण (पिंपळगाव मोची), आखाडे क्रांती रामनाथ (पिंपळगाव मोची), क्षीरसागर ज्ञानदेव लक्ष्मण (बहीरवाडी), पवार सुलोचना सुधाकर (बहीरवाडी), देवडे अर्चना गुंडीबा (बेलखंडी पाटोदा), शेख सैनाजबी पाशाभाई (बेलखंडी पाटोदा), तुपे सारीका शेषराव (बेलखंडी पाटोदा), अधापुरे कालिंदा रघुनाथ (नागझरी/मान्याचा वाडा), पवार परमेश्वर गिन्यानदेव (म्हाळसापूर), पाटोळे श्रीकृष्ण नामदेव (म्हाळसापूर), राऊत कविता प्रदीप (म्हाळसापूर), थोरात पारुबाई अर्जुनराव (आनंदवाडी), चांदणे सुनिता महेश (आनंदवाडी), अडागळे दैवशाला राजेभाऊ (जिरेवाडी), श्रीमती पालक गिता बाबुराव (कळसंबर), श्रीमती धन्वे शितल नंदकुमार (कळसंबर), चिंचकर योगेश भिमराव (कळसंबर), मोरे नवनाथ गगनाथ (मानेवाडी), श्रीमती डुकरे आशा रविंद्र (पिंपळगाव मंझरा), बंगाळ राजाभाऊ लिंबाजी (वासनवाडी), बहिरवाळ अश्‍विनी बाळासाहेब (कर्झणी), कदम सुनिता भाऊसाहेब (कदमवाडी), कदम जगदीश भाऊसाहेब (कदमवाडी), ढेकळे केशरबाई दादाराव (तिप्पटवाडी), अंधारे सतिश सोजर (गुंधा, उनवणे सारीका रावसाहेब (गुंधा, शिंदे जयश्री सुनिल (गुंधा, ढोकणे किशोर नरहरी (नागापूर बु.), साळुंके भरतरी जालिंदर (नागापूर बु.), ढोकणे रुपा सुखदेव (नागापूर बु.) साळुंके सिमा रामप्रसाद (नागापूर बु.), बिडवे संतोष तुळशीराम (मौज/ब्रह्मगाव), मंगल सुंदर कोकाटे (मौज ब्रह्मगाव), कोमटवार अजय दिलीप (दिंद्रुड), जाधव सुनिता बाळासाहे (दिंद्रुड), देशमाने अविध्या मधुकर (दिंद्रुड), कटारे गंगाबाई बाबुराव (दिंद्रुड), कटारे वसंत भगवान (दिंद्रुड), गौंडर भारत देवीदास (दिंद्रुड), चांदबोधले भागुबाई विश्‍वनाथ (दिंद्रुड), सुरवसे कमलाबाई दगडु (दिंद्रुड), बडे सोनाली विलास (चोपनवाडी), वनवे गणेश बाबासाहेब (चोपनवाडी), गायकवाड पुष्पा पोपट (नित्रुड), बडे सविता सुर्यकांत (नित्रुड), गायकवाड कांतराव आबासाहेब (नित्रुड), मुंडे सुषमा उद्धव (नित्रुड), आवाड पांडुरंग सुखदेव (नित्रुड), भागवत नानासाहेब गडदे (गंगामसला), पंडित पंकज विठ्ठल (गंगामसला), संगिता माऊली गवळी (गंगामसला), राठोड गंगा संजय (मोगरा), चव्हाण भागुबाई श्रीराम (मोगरा), घनगाव सनिता सुभाष (मोगरा), शेख उजमा अमजद (मोगरा), ढेरे दिलीप सखाराम (बेदरवाडी), शेलार आसराबाई लक्ष्मण (निरगुडी), आरगडे रुक्मिणी अशोक (दासखेड), वारभुवन गोकुळ अंबादास (पारगाव घुमरा) गांगुर्डे रंगुबाई यशवंत (पारगाव घुमरा), साठे लक्ष्मीबाई दादा (पारगाव घुमरा), जाधव आनुबा नामदेव (कोथंबीरवाडी), गोविंद प्रकाश गायकवाड (भेपा), सुरेखा अंकुश तिडके (भोपा), मिना गणेश पटेकर (भोपा), बडे सुनंदा महादेव (कासारी), बडे राणीबाई ज्ञानोबा (कासारी), जाधव (गिरजाबाई ज्ञानोबा), जाधव गिरजाबाई प्रभू (कासारी), कोंबडे बंडु बाबुराव (जहागीरमोहा), कोकाटे दिक्षा हनुमंत (जहागीरमोहा), बिल्पे शिवकन्या वसुदेव (जहागीरमोहा), सिरसट (संगिता विजय (जहागीरमोहा), कांदे शोभा रामधन (जहागीरमोहा), काशिनाथ गोविंद गायकवाड (रुई धारूर), सुनिता विजय राठोड (रुई धारूर), पवार परसराम भगवान (धनगरवाडी पिंपळा), खुरंगे पुजा राजू (धनगरवाडी पिंपळा), शेंडगे रामदास भगवान (पिंपळा), अरुण सतीश मळू (पिंपळा), लोखंडे रंजना शिवाजी (पिंपळा), खटके सुधा विलास (पिंपळा), माळी साहेबराव राजाराम (शेरी बु.), गोरे स्वाती माने (शेरी बु.), गिरगुणे मंगल मोहन (वटणवाडी), नरवडे सीमा दीपक (वटणवाडी), इरकर परमेश्वर यमाजी (सोलापूरवाडी), वायाळ कावेरी श्रीकृष्ण (सोलापूरवाडी), भोसले संगीता विष्णू (धनगरवाडी), गिरी शांताबाई बन (धनगरवाडी), शेंडगे अर्जुन धोंडीबा (सुंबेवाडी), शेंडगे हौसाबाई अर्जुन (सुंबेवाडक्ष), पंडागळे सिंधु शहादेव (हातोला), कुंतरवाडे लक्ष्मी कारभारी (हातोला), शेख मतीन रशीद (मादळमोही), भोपळे हरी शिवाजी (मादळमोही), धुरंधरे कल्याण वामनराव (मादळमोही), वाघमारे अल्का अरुण (मादळमोही), पुरी गितांजली सोमनाथ (मादळमोही), धुरंधरे आशाबाई अंकुश (मादळमोही), माने पल्लवी विलास (मानमोडी), इरले काका चंद्रकांत (मानमोडी), तावरे वैशाली सर्जेराव (जव्हारवाडी), जावरे द्रोपती गहिनाथ (जव्हारवाडी), तारगे मीनाबाई दिलीप (वंजारवाडी), जाधव दिगांबर शामराव (कुंभारवाडी), उगलमुगले गहिनीनाथ जालिंदर (गढी), कांबळे सुदामती विक्रम (गढी), नाकाडे सुरेखा नवनाथ (गढी), मोटे अर्चना अशोक (गढी), यमगर वैशाली बाळू (तळेवाडी), थोटे अयोध्या लक्ष्मण (तळेवाडी), पवार भीमराव अहिलाजी (मन्यारवाडी), पवार गंधारीबाई पोपट (मन्यारवाडी), महंमद यासीन अखिल (पांढरवाडी), महंमद रहेनाबी रऊफ (पांढरवाडी), वाघमोडे आसाराम मधुकर डोईफोडवाडी), मोरे अलका नानासाहेब (डोईफोडवाडी), भारती निकीता बाबासाहेब (डोईफोडवाडी), रोकडे अंकुश दामू (डोईफोडवाडी), रोकडे पुजा अशोक (डोईफोडवाडी), हातागळे बबिता किसन (चव्हाणवाडी), गर्जे गहिनीनाथ महादेव (चव्हाणवाडी), बिचकुले कारभारी साहेबराव (गोविंदवाडी तहत तलवाडा), सिंगाडे किस्किंदा बाबा(गोविंदवाडी तहत तलवाडा), हातागळे आरती अशोक (गोविंदवाडी तहत तलवाडा), काळे ईश्वर शाहूराव (गंगावाडी), हातागळे भास्कर आसाराम (गंगावाडी), काळे सुरेखा श्रीनिवास (गंगावाडी), साबळे राजूबाई शहादेव (तलवाडा), मस्के फुलाबाई चंदु (तलवाडा), काळे समिंद्राबाई प्रभू (तलवाडा), पवार दिगांबर सावळा (तलवाडा), जाधव सावित्राबाई लहू (तलवाडा), गर्जे रंजना कृष्णा (तलवाडा), तवले शारदा नामदेव (सुर्डी बु.), थडके अलका इंदर (सुर्डी बु.), चोपडे उत्तम गिरजाप्पा (चोपड्याचीवाडी), तुरे सत्यभामा विनायक (चोपड्याचीवाडी), गचांडे भाग्यश्री सचिन (टाकळगव्हाण तरफ तालखेड), अडागळे बाळू सकाराम (टाकळगव्हाण तरफ तालखेड), खडके वर्षा अर्जुन (बाबुलतारा), देवकुळे पद्माबाई दशरथ (खेर्डा बु.), क्षीरसागर सुदामती सटवाराम (खेर्डा बु.), भारती बाबु बालासाहेब (खेर्डा बु.), देवकुळे द्वारकाबाई विठ्ठल (खेर्डवाडी), वाघमोडे शिवकन्या राजेंद्र (खेर्डावाडी), भारती राहिबाई भारत (खेर्डावाडी), भिसे रुखमिनी विठ्ठल (खेर्डावाडी), चाटे सुनिता हरीचंद (मोहा), शिंदे कुशवर्ता विष्णू (मोहा), वाघमारे मदन लिंबराव (मोहा), राठोड कविता कुंडलिक (सरफराजपूर), पवार गवळणबाई टोपा (वंजारवाडी), वाव्हळे भिमराव आश्रुबा (गडदेवाडी), गडदे रुमाबाई गजेंद्र (गडदेवाडी), फड योगिता शंकर (मुर्ती), फड रामराव सदाशिव (मूर्ती), केंद्रे चंद्रकला विजय (केंद्रेवाडी), तरकसे चांगदेव सटवाजी (केंद्रेवाडी), केंद्रे बालासाहेब महादेव (केंद्रेवाडी), गिते शोभा लहुदास (हनुमंतवाडी), सोनपीर कौशल्या महादेव (हनुमंतवाडी), भालेकर शांताबाई उत्तम (हनुमंतवाडी), गोमसाळे आशाबाई वैजनाथ (वाकडी, कांदे सिताबार्स रामकृष्ण (वाकडी), कांदे सुधाकर दत्तात्रय (वाकडी), तरकसे देवानंद मधुकर (धावडी), नेहरकर मधुकर किसनराव (धावडी), चाटे अनिता रमेश (धावडी), गिते संध्या त्रिंबक (दत्तपूर), पुरी उत्तम विश्‍वनाथ (धत्तपूर), गर्जे सिंधु व्यंकट (अंबलवाडी), दहीवाडे कोताजी लक्ष्मण (अंबलवाडी), काळे पार्वती आत्माराम (अंबलवाडी), चौरे विनोद बाबुराव (नारेवाडी), कांबळे अशोक भगवान (शिंदी), जगताप कुसुम परसराम (शिंदी), मुजमुले निलाबाई लिंबा (धोतरा), खंडागळे वैशाली शहाजी (लाखा), धाकतोंडे पार्वती यशवंत (लाखा), आंधळे झुंपाबाई नामदेव (आंधळेवाडी), वाघमारे लोचनाबाई साहेब (विडा/गौरवाडी), सावंत सुवर्णमाला दत्तात्रय (विडा/गौरवाडी), सावंत सुवर्णमाला दत्तात्रय, राठोड रमेश खिरामन (येवता), मोराळे किसकिंदा रामराव (बानेगाव), जाधवर अनिता प्रशांत (काशीदवाडी), उर्मिला लालगीर गिरी (सुकळी), शिल्पा अशोक मस्के (सुकळी), बालाजी हरी गिरी (सुकळी), जाधव संदीप बाळासाहेब (रामेश्वरवाडी), खाडे पार्वती रामकर्ण (रामेश्वरवाडी), सरवदे बाबासाहेब गंगाधर (पैठण), दिक्षित विजया विष्णू (पैठण), दिक्षित सुरेश राजााभऊ (पैठण), काळे सकुबाई मारोती (घाटेवाडी), गिरी वर्षा सतिष (घाटेवाडी), जाधव विजयमाला बाळासाहेब (भोपला), खटावकर अनिता अनिल (जाधवजवळा), जावळे उर्मिला गौतम (जाधवजवळा), घोळवे शांताबाई शहादेव (मुंढेवाडी), घोळवे अर्जुन जालिंदर (मुंढेवाडी), पांगे सखाराम मल्लिकार्जून (पाथरा), राऊत मिरा पांडुरंग (पाथरा), केदार आशाबाई हनुमंत (गप्पेवाडी/नामेवाडी), वायबसे दिनकर शामराव (गप्पेवाडी/नामेवाडी), नेटके पुजा देविदास (काळवाडी) या सदस्यांचा अपात्रेत समावेश आहे.
Exit mobile version