Site icon लोकाशा-बंब न्यूज

बीड जिल्हा सीए व टॅक्स प्रॅक्टिशनर्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी बी. बी. जाधव तर सचिव पदी गोपाल लड्डा यांची निवड


बीड जिल्हा सीए व टॅक्स प्रॅक्टिशनर्स असोसिएशनच्या वर्ष 2023 ते 2025 या कार्यकाळासाठी सीए जाधव यांची अध्यक्ष तर सीए गोपाल लढ्ढा यांची सचिव म्हणून सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली मावळते अध्यक्ष सीए गोपाल कासट यांच्या अध्यक्षतेखाली बीड येथे झालेल्या बैठकीत या निवडीचा ठराव मंजूर करण्यात आला. यासह सीए गोपाल मालू यांची उपाध्यक्ष म्हणून, सीए पंकज टवानी यांची कोषाध्यक्ष तर सीए महेश मुंडे यांची सहसचिव म्हणून निवड करण्यात आली.
या बैठकीत मावळते सचिव सीए आदेश नहार यांनी मागील कार्यकाळात केलेल्या कामांचा आढावा सर्वांसमोर सादर केला व सर्व सभासदांचे आभार मानले. याचबरोबर नूतन अध्यक्ष बी बी जाधव यांनी आगामी कामात बीड येथून संभाजीनगर व जालना येथे हलवण्यात आलेले आयकर कार्यालय परत बीड येथे कार्यान्वित करण्यात यावे यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे सभागृहास सांगितले.

Exit mobile version