Site icon लोकाशा-बंब न्यूज

दोन हजाराची लाच घेताना धारुर तहसीलचा लिपीक रंगेहाथ पकडला, बीड एसीबीची कारवाई, लाचखोरावर गुन्हा दाखल


धारूर, दि. 2 (लोकाशा न्यूज) : धारुर येथील तहसील कार्यालयात लिपिक पदावर कार्यरत असणारे महेश कोकरे यांना लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडून कारवाई केली आहे. तालुक्यातील आसरडोह येथील स्मशानभूमीच्या नोंदीसाठी त्यांनी दोन हजार रुपयांची लाचेची मागणी केली होती.

धारुर तालुक्यातील आसरडोह येथील लिंगायत समाजाच्या स्मशानभूमीची नोंद करण्यासाठी तहसील कार्यालयात लिपिक पदावर कार्यरत असणार्‍या महेश कोकरे या कर्मचार्‍यांने लाचेची मागणी करण्यात आली होती . अखेर दोन हजार रुपयाची लाच मागितली होती. यासंदर्भात लाचलुचपत प्रतिबंधात्मक विभाग बीड यांच्या कडे फिर्यादी व्यक्तीने तक्रार दाखल केली होती. लाच लुचपत विभागाच्या अधिकार्‍यांनी दि. 1 शुक्रवारी रोजी दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास सापळा रचून महेश कोकरे यास तहसिल कार्यालयातच लाच स्विकारताना रंगेहात पकडले. या प्रकरणात कोकरे यांच्या विरोधात लाच घेतल्या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे. धारूर पंचायत समिती येथील एका ग्रामसेवकास एक महीन्यापुर्वी लाच मागीतल्यामुळे कारवाई केली होती. आता तहसिल कार्यालयात लिपीकास लाच घेताना पकडले आहे. तालुका स्तरावरील प्रमुख कार्यालयातच चिरीमिरीचे प्रकार वाढल्याचे चित्र दिसत आहे.
Exit mobile version