Site icon लोकाशा-बंब न्यूज

दोन हजाराची लाच स्विकारताना कृषी सहाय्यक एसीबीच्या जाळ्यात

पाटोदा लोकाशा न्यूज
कांदाचाळीचे अनुदान मंजुरीसाठी कृषी सहाय्यकाने २ हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडण्याची घटना पाटोद्यात घडली आहे. हा सापळा बीड एसीबीच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, तक्रारदार दिलीप असराजी सानप पाटोदा तालुक्यातील सौताडा येथील रहिवासी असून त्यांच्या शेतात कांदाचाळ मंजूर झाली असून त्यांचे काम पुर्ण करण्यात आले आहे. दरम्यान कृषी अधिकारी कार्यालयातुन अनुदान मंजूर करण्यासाठी त्यांनी अर्ज केला होता, यात कृषी सहाय्यक कृष्णा महादेव आगलावे यांनी ५ हजार रुपये लाचेची मागणी केली होती. तडजोडीअंती २ हजार रुपयाची लाच देण्याचे ठरविले. दरम्यान याबाबत दिलीप सानप यांनी एसीबी कडे तक्रार दिली.
या अनुषंगाने पथकाने दि.३१ मे बुधवार रोजी दुपारच्या सुमारास कृषी अधिकारी कार्यालयात सापळा रचून २ हजार रुपयाची लाच स्विकारतांना कृषी सहाय्यक कृष्णा आगलावे याला रंगेहात पकडले आहे. याप्रकरणी बातमी लिही पर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती

Exit mobile version