Site icon लोकाशा-बंब न्यूज

गुन्हेगारांना धडा शिकविण्यासाठी डीवायएसपी उतरले रस्त्यावर, बेशिस्त वाहन धारकांवरही जागच्या जागीच केली कारवाई


बीड, दि. 26 (लोकाशा न्यूज) : गुन्हेगारांना धडा शिकविण्यासाठी बीडचे डीवायएसपी संतोष वाळके आणि डीवायएसपी श्‍वेता खाडे हे दोघे जण आपला ताफा घेवून शुक्रवारी रस्त्यावर उतरल्याचे पहायला मिळाले. यावेळी त्यांनी बीड शहरातील बेशिस्त वाहनधारकांनाही चांगलीच अद्दल घडविली. यावेळी बेशिस्त वाहनधारकांवर जागच्या जागी कारवाई करण्यात आली.
एक चांगल्या भावनेतून सुट दिल्यास त्याचा अनेक नागरिक गैरवापर करतात, याचा प्रत्यय बीड शहरात सातत्याने येत आहे. यातून छोट्या मोठ्या घटनाही घडत आहेत. त्यामुळेच रात्री दहानंतर एकही दुकान शहरात उघडी राहणार नाही, याची काळजी बीड पोलिसांकडून घेण्यात येत आहे. त्याअनुषंगानेच शुक्रवारी सायंकाळी सहाच्या सुमारास डीवायएसपी संतोष वाळके, डीवायएसपी श्‍वेता खाडे, बीड शहर ठाण्याचे प्रभारी ठाणेदार श्री. ढाकणे, एपीआय ध्रोकट यांनी आपला पोलीस स्टप सोबत घेवून बीड शहरातील बशीरगंज, जुनी भाजी मंडई, सुभाष रोड, एसटी बस स्टँड याभागात गुन्हेगारांवर वचक ठेवण्यासाठी एक राऊंड मारला. यावेळी शहरातील बेशिस्त पार्किंग करणार्‍या वाहनांवरही जागच्या जागीच कारवाई करण्यात आली.

Exit mobile version