Site icon लोकाशा-बंब न्यूज

खळबळजनक : परळीत ट्रॅव्हल्स चालकानीच केला प्रवासी महिलेचा विनयभंग ;परळी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल


परळी वैजनाथ दि २५ (लोकाशा न्युज) :- कोणत्याही ठिकाणी जर ट्रॅव्हल्सने प्रवास करतांना महिला एकटी असेल तर नातेवाईक ज्यांच्या विश्वासावर महिलांना आपल्या गावी पाठवतात त्या ट्रॅव्हलचालकानेच पुणे – परळी दरम्यान महिलेचा विनयभंग केल्याची खळबळजनक घटना घडली. दरम्यान ह्या प्रकरणी परळी शहर पोलीस ठाण्यात ट्रॅव्हल्सच्या चालकावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने मात्र ट्रॅव्हल्स ने प्रवास करणाऱ्या प्रवाशात चिंतेचे वातावरण पसरले आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, दिनांक २४/०५/२०२३ रोजी यातील एक महिला‌ फिर्यादी रा जिरेवाडी ता‌‌ परळी वैजनाथ ह मु भोसरी पुणे ही येरवडा पुणे ते परळी वैजनाथ असा गंगाखेड – पुणे – गंगाखेड चालणाऱ्या स्वराज द्रवल्सने प्रवास करत असताना सदर आरोपी दत्ता विठ्ठल मोहिते राहणार गंगाखेड हा ट्रॅव्हल्सचा चालक असुन त्याने वाईट हेतुने फिर्यादीस ट्रॅव्हल्समधे पाठीमागे चला, नाहीतर मी सीटवर येवु का असे असे म्हणुन तुझा पर्सनल मोबाईल नंबर मला द्या तुम्ही मला खुप आवडतात असे म्हणाला व फिर्यादी ही प्रवासादरम्यान जेवणासाठी थांबली असता तुम्हाला जेवण खावु घालतो तुम्ही माझी भुक भागवा असे म्हणुन फिर्यादीच्या मनास लज्जा उत्पन्न होईल अशा प्रकारचे गैर वर्तन करून विनयभंग केल्याची खळबळजनक घटना घडली. याप्रकरणी महिलेने ताबडतोब शहर पोलीस स्टेशन गाठले आणि झाला प्रकार ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रकांत गोसावी यांना सांगितला. गोसावी यांनी क्षणाचाही विलंब न करता आरोपी दत्ता विठ्ठल मोहिते राहणार गंगाखेड यांच्याविरुद्ध गु र नंबर १०९/२०२३ कलम ३५४ भादवी‌ नुसार गुन्हा दाखल केला असुन पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत. अधिक तपास सपोनि गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली मपोह सखू लक्ष्मण गित्ते ह्या करीत आहेत.
दरम्यान ट्रॅव्हल्स ने प्रवास करणाऱ्या महिलांचे रक्षण करणाऱ्या चालकांनी प्रवासी महिलेचा विनयभंग केल्याने प्रवासी वर्गात चिंतेचे वातावरण पसरले असून एकट्या महिलेस ट्रॅव्हल्स पाठवण्याबाबत समस्या निर्माण झाली आहे. पोलिसांनी संबंधित आरोपीस कठोर शासन करावे जेणेकरून आगामी काळात असा प्रकार करण्याची हिम्मत होणार नाही.

Exit mobile version