बीड, बीड शहर ठाण्याच्या हद्दिमधील बशीर गंज चौकात दोन गटात वाद झाला, यावेळी दोघांना मारहाण झाली आहे, ही घटना मंगळवारी रात्री साडे आकाराच्या सुमारास घडली, या घटनेनंतर स्वतः पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर, डीवायएसपी संतोष वाळके, डीवायएसपी shewta खाडे, बीड शहर ठाण्याचे प्रभारी श्री. ढाकणे यांनी भेट दिली, विशेष म्हणजे यातील आरोपींना तात्काळ अटक करण्यासाठी स्वतः पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर हे पेठ बीड ठाण्यात तर एएसपी सचिन पांडकर, डीवायएसपी संतोष वाळके हे बीड शहर ठाण्यात रात्री उशिरपर्यंत तळ ठोकून होते, या घटनेच्या आधी रात्री आठ वाजता शिवाजी नगर ठाण्याच्या हद्दीत दोन तरूनामध्ये संभाजी नगरच्या ठेवलेल्या स्टेटस वरून वाद झाला, यावरून एकाला मारहाणही झालेली आहे, यातील अरोपीचाही पोलिसांकडून रात्री उशिरपर्यंत शोध सुरू होता.
बीडमध्ये दोन गटात वाद, दोघांना मारहाण, आरोपींच्या अटकेसाठी स्वतः पोलिस अधीक्षक पेठ बीड ठाण्यात तर एएसपी आणि डीवायएसपी बीड शहर ठाण्यात तळ ठोकून
