Site icon लोकाशा-बंब न्यूज

कामात हलगर्जीपणा अजिबात खपवून घेणार नाही, पावसाळ्यापुर्वी कामे पुर्ण करा, सीईओ अजित पवारांचे स्पष्ट आदेश, सुरू असलेल्या कामांची सीईओंनी केली पाहणी


बीड, दि. 19 (लोकाशा न्यूज) : कामात हलगर्जीपणा अजिबात खपवून घेणार नाही, पावसाळ्यापुर्वी कामे पुर्ण करा, असे आदेश सीईओ अजित पवार यांनी संबंधित यंत्रणेला दिले आहेत. त्यांनी काल वडवणी, गेवराई आणि माजलगाव याठिकाणी दौरा करून विविध कामांची पाहणी केली. यावेळी त्यांनी हे आदेश दिले आहेत.
बीड सध्या जलजीवनबरोबरच नरेगाची मोठ्या संख्येने कामे सुरू आहेत. तसेच पंधराव्या वित्त आयोगातून ठिकठिकाणी कामे केली जात आहेत. या कामांना गती देण्याबरोबरच ही सर्व कामे दर्जेदार व्हावीत याअनुषंगाने शुक्रवारी सीईओ अजित पवार यांनी वडवणी, माजलगाव आणि गेवराई तालुक्याचा दौरा केला, त्यांनी यावेळी जलजीवन मिशन, पंधरावा वित्त आयोग, नरेगाच्या कामांना भेटी देवून पाहणी केली. कोणत्याही परिस्थितीत पावसाळ्यापुर्वी कामे पुर्ण करा, कामात हलगर्जीपणा अजिबात खपवून घेणार नाही, अशा स्पष्ट सुचना त्यांनी यावेळी संबंधित यंत्रणेला दिल्या. यावेळी त्यांच्या समवेत परिविक्षाधीन जिल्हाधिकारी आदित्य जीवने, नरेगाचे बीडीओ सचिन सानप यांच्यासह इतर अधिकारी आणि कर्मचार्‍यांची उपस्थिती होती.

पुनर्भरणाच्या कामालाही गती द्या

या दौर्‍यात त्यांनी पुर्नभरणाच्या कामाकडेही आपल्या यंत्रणेचे लक्ष वेधून घेतले. विहीरीतील पाण्याची पातळी वाढविण्यासाठी जास्तीत जास्त शेतकर्‍यांना आपल्या पुर्नभरण करून घेण्यासाठी प्रोत्साहीत करा, अशा सुचनाही यावेळी सीईओ अजित पवारांनी दिल्या आहेत.
Exit mobile version