Site icon लोकाशा-बंब न्यूज

सीईओंचा दणका, शिक्षकाला थेट सेवेतून केले बडतर्फ


बीड, दि. 18 (लोकाशा न्यूज) : सातत्याने तक्रारी करणार्‍या आणि कोविड लसीकरणाबाबत चुकीची भुमिका घेणार्‍या  परळी तालुक्यातील एका शिक्षकास सीईओ अजित पवार यांनी मोठा दणका दिला आहे. त्या शिक्षकाला सीईओंनी थेट सेवेतून बडतर्फ केले आहे.
रघुनाथ भागवतराव दिवरात (पोहनेर शाळा ता. परळी) असे बडतर्फ केलेल्या शिक्षकाचे नाव आहे. हा शिक्षक अधिकार्‍यांच्या विरोधात खोट्या तक्रारी करत होता, विशेष म्हणजे कोविडमधील लसीकरणाबाबत त्यांनी अधिकार्‍यांवर आरोप केले होते, त्यानंतर सीईओंनी त्यांना थेट निलंबित करून विभागीय चौकशी प्रस्तावित केली होती. या चौकशीत सदर शिक्षक दोषी आढळल्याने सीईओ अजित पवार यांनी आता त्यांना थेट सेवेतून बडतर्फ केले आहे. सीईओंनी केलेल्या या कारवाईमुळे जिल्ह्यातील अनेक शिक्षकांचे धाबे दणाणले आहेत.

Exit mobile version