बीड, संपूर्ण देशाचं लक्ष लागून असलेल्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू झाली आहे. कर्नाटक विधानसभेच्या 224 मतदारसंघांसाठी 10 मे रोजी झालेल्या निवडणुकीची मतदान पूर्ण झालं. या वेळी राज्यात विक्रमी 73.19 टक्के मतदान झालं.224 जागांसाठी निकाल हा आज जाहीर होणार आहे. त्यानुसार याठिकाणी भाजप कोमात तर काँग्रेस जोमात असल्याचे पाहायला मिळत आहे, 118 जागांवर काँगेस आघाडीवर आहे तर भाजप 75,जेडीएस 25 तर इतर सहा जागांवर आघाडीवर आहेत.
कर्नाटकात भाजप कोमात, काँग्रेस जोमात, 118 जागांवर आघाडीवर, भाजप 75, जेडीएस 25, कर्नाटकचा कल पाहून खासदार संजय राऊत चार्ज झाले
