Site icon लोकाशा-बंब न्यूज

पंकजाताई मुंडेंच्या नेतृत्वाची चिमुकलीला देखील पडली भुरळ, नांदेडहून आई-वडिलांना घेऊन खास भेटायला आली परळीत, पंकजाताईंनीही केलं तीच्या गुणांचं तोंडभरून कौतुक

परळी वैजनाथ ।दिनांक ०७।
भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांना मानणारा मोठा वर्ग राज्यात व राज्याबाहेरही आहे.सर्व सामान्य घटकांमध्ये त्या विशेष लोकप्रिय आहेत. केवळ तरूण, तरूणीच नाही तर लहान मुलेही त्यांना प्रचंड लाईक करतात, प्रभावित होतात, त्यांच्या धडाडीच्या नेतृत्वाची अशाच एका पाच वर्षाच्या चिमुकलीला देखील भुरळ पडली आणि ती त्यांना खास भेटायला म्हणून आई-वडिलांना घेऊन परळीला येऊन गेली.

झालं असं, नांदेड येथील साईनाथ हमंद यांची पाच वर्षे वयाची चिमुकली कु. शर्वरी हिला पंकजाताई मुंडे यांच्या नेतृत्वाचं प्रचंड वेड..त्यांची भाषणे, मुलाखती, त्याचबरोबर त्यांच्यातील कणखरपणा तीला खास करून आवडतो. पंकजाताईंना एकदा तरी जवळून भेटता यावं, बोलावं अशी तिची मनापासून इच्छा होती. पंकजाताई परळीत असल्याचं तिला समजलं आणि आई-वडिलांकडे हट्ट करून ती त्यांना भेटायला परळीला त्यांच्या घरी आली. पंकजाताई देखील तिला भेटल्या, जवळ घेतलं, तिच्याशी छान गप्पा मारल्या, सुरेल आवाजातील तिचं गाणंही ऐकलं. फोटोही काढले. एवढया लहान वयात असलेल्या तिच्यातील गुणांचं त्यांना नवल वाटलं, त्यांनी तिचं कौतुक करत शाबासकी दिली. शर्वरीसारखी चुणचुणीत मुलगी आपली फॅन असल्याचं पाहून त्याही क्षणभर भारावून गेल्या.
••••

Exit mobile version