Site icon लोकाशा-बंब न्यूज

राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदी शरद पवारच! समितीने शरद पवारांचा राजीनामा फेटाळला!


मुंबई :

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा राजीनामा अखेर समितीने फेटाळला आहे. राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा नामंजूर करण्याचा प्रस्ताव मांडला आणि समितीने तो फेटाळला.

राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी देखील यापूर्वी पत्रकारांशी बोलताना राष्ट्रवादीच्या कार्यालयाबाहेर माहिती दिली होती. कार्यकर्ते ऐकायला तयार नसल्याने व अध्यक्षपदी शरद पवारच हवेत अशी कार्यकर्त्यांची मागणी असल्याने, आम्ही स्वतःही हा प्रस्ताव मांडणार आहोत असे भुजबळ यांनी सांगितले होते. त्यानुसार समितीने हा राजीनामा फेटाळला आहे. त्यामुळे शरद पवार हेच राष्ट्रवादीचे अध्यक्ष राहणार यावर शिक्कामोर्तब समितीने केली आहे.

दरम्यान शरद पवार जोपर्यंत हा निर्णय मागे घेत नाहीत, तोपर्यंत आंदोलन करण्याचा इरादा असलेल्या राष्ट्रवादीच्या कार्यालयाबाहेरील पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मोठा दिलासा मिळाला असून हे वृत्त बाहेर येतात कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी जल्लोष केला आहे. गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादीचे मोठे मोठे पदाधिकारी व कार्यकर्ते राष्ट्रवादीच्या कार्यालयासमोर ठाण मांडून आहेत. शरद पवार यांचा राजीनामा नामंजूर करण्याचा प्रस्ताव बैठकीत येणार असल्याची माहिती त्यांना मिळाल्यानंतर त्यांनी देखील दिलासा व्यक्त केला होता.

अर्थात शरद पवार हे अध्यक्षपदी राहणार हे आता निश्चित झाले असले तरी पक्षांमध्ये नवीन कार्याध्यक्ष हे पद येण्याची शक्यता आहे त्या संदर्भात नेमकी आत मध्ये काय चर्चा झाली हे मात्र समजू शकलेले नाही. यासंदर्भात समितीमध्ये चर्चा होणार असल्याची समजते. त्यामुळे राष्ट्रवादीचा नवा कार्याध्यक्ष कोण याची कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता आहे.

Exit mobile version