Site icon लोकाशा-बंब न्यूज

शुभ शकुन;गजानन सूत गिरणीचे सर्व संचालक बिनविरोध, माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्यासह 21 संचालक बिनविरोध

बीड/प्रतिनिधी
सध्या बाजार समितीच्या निवडणुकीची रणधुमाळी चालू असतानाच माजी मंत्री जयदत्त अण्णा क्षीरसागर यांच्या श्री गजानन सहकारी सूतगिरणी चा बिनविरोध निकाल जाहीर झाला आहे अण्णांसाठी हा निकाल शुभ शकुन मानला जात आहे, बाजार समितीसाठी आज दिनांक 28 रोजी मतदान होणार असून हा निकाल येण्यापूर्वीच सूतगिरणीचे सर्व संचालक मंडळ बिनविरोध निवडून आल्याची घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी गो क परदेशी यांनी केली आहे

श्री गजानन सहकारी सूतगिरणी मर्यादित इट या वर्गातील सुतगिरणीच्या सन 2023 ते 2028 या कालावधीची संचालक मंडळाची निवडणूक प्रक्रिया नुकतीच पार पडली आहे दिनांक 27 एप्रिल रोजी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी जेवढ्या जागा होत्या तेवढेच अर्ज शिल्लक राहिल्यामुळे सूतगिरणीची निवडणूक अविरोध झाल्याची घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी परदेशी यांनी केली आहे

या संचालक मंडळात बिनविरोध निवडून आलेले माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर, माधवराव मोराळे, बालाप्रसाद जाजू, कल्याण खांडे, विश्वंभर सावंत, अरुण बोंगाणे, अंकुश उगले, अच्युत शेळके, कोंडीराम निकम, नसिरुद्दीन शेख, विष्णुदास बियाणी, देविदास मंचुके, धनंजय जगताप, अमोल देशमुख, बाबुराव राठोड, जयदत्त थोटे, चिमाजी वाघमारे, रोहित क्षीरसागर, लक्ष्मण लकडे, श्रीमती सुजाता जाधव, श्रीमती योगिता मिसाळ या 21 संचालकांची निवड घोषित करण्यात आली असून बाजार समितीच्या निवडणुकीपूर्वीच सूतगिरणीचा निकाल लागला आहे,यापूर्वीच बीड तालुका दूध संघ आणि श्री गजानन नागरी सहकारी बँक या दोन्हीही संस्थांचा निकाल बिनविरोध जाहीर झाला आहे एकंदरीतच माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या ताब्यात असलेल्या सर्व सहकारी संस्था बिनविरोध निवडून आले असून बाजार समितीचा निकाल ही त्यांच्याच बाजूने लागणार असल्याने हा शुभ शकुन मानला जात आहे,त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह दिसून येत आहे, सर्व विजयी संचालकांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे

जिल्यातील कापूस उत्पादकांना जिल्यातच बाजारपेठः-

ऊस तोड मजूर कामगारांचा दुष्काळी जिल्हा म्हणून बीड जिल्याची ओळख आहे. हे चित्र बदलण्यासाठी बीड तालुक्यातील ईट येथील सूतगिरणीने बदलले आहे. माजी मंत्री तथा चेअरमन जयदत्त क्षिरसागर यांनी सूतगिरणीस पुनरुज्जीवित करून शेतकऱ्यांच्या कापसाला थेट प्रक्रिया उद्योगाची जोड देऊन मोठी बाजारपेठ उपलब्ध करुन दिली आहे.
शेतकऱ्यांचा उत्पादीत कापूस हा जिनिंग उद्योगाद्वारे गाठीत रुपांतरीत होतो, त्या गाठी सूतगिरणीत खरेदी करते. पुढे त्या गाठीच्या कापूसावर प्रक्रिया करून धागा निर्मिती केली जाते. त्या दर्जेदार धाग्याची विदेशात निर्यात होत आहे. एकंदरीत जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळावा म्हणून तसेच शेतकरी आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचे प्रभावशाली काम माजी मंत्री जयदत्त
क्षिरसागर यांच्या प्रयत्नातून सूत गिरणीच्या माध्यमातून होत आहे. सूत गिरणी ही कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी वरदान ठरली आहे.

सूताची निर्मितीः- महाराष्ट्र शासन व केंद्र सरकार, एन. सी. डी. सी. या वित्तीय संस्थेच्या तसेच सर्व
सभासदांच्या सहकार्याने 20064 चात्यावर प्रत्यक्ष उत्पादनाची प्रक्रिया दि. 14/08/2018 ला सुरू होऊन आजतागायत 20064 चात्या अखंडित सुरू आहेत. यामुळे आपल्या दुष्काळग्रस्त जिल्ह्यात जवळपास प्रत्यक्ष 270 ते 300 व अप्रत्यक्ष 100 ते 150 कामगारांना रोजगार उपलब्ध झाला आहे.

विदेशात गेले सूतः – सुरु जागतिक महामारी ( कोव्हिड 19 ) मध्ये जागतिक आर्थिक मंदी असतांना अनेक कामगारांचे रोजगार बंद होत असतांना सुध्दा आपल्या भागातील कामगारांना रोजगार देण्याचे कार्य आपल्या सूतगिरणीने केले आहे. या 9 ते 10 महिन्यात संचालक मंडळाच्या अथक प्रयत्नांनी तसेच सर्व कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने आपल्या सूतगिरणीने या काळात परदेशात चीन, बांगलादेश, तुर्की या देशांना
सन 2020-21 मध्ये 15.06 कोटी, 2021-22 मध्ये 17.93 कोटी व 2022-23 मध्ये 1.86 कोटी असे एकूण 34.85 कोटीचे सूत निर्यात केलेले आहे. तसेच मागील 3 अर्थिक वर्षात एकूण 156.52 कोटीचे सूत स्थानिक मार्केटमध्ये विकले गेले आहे. जानेवारी- 2023 पासून 20 कंटेनर चे सूत निर्यात होणार असून 7 व्या कंटेनरचे पूजन माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांचे हस्ते पूजन करून दि. 21/04/2023 रोजी न्हावा-सिव्हा पोर्ट मुंबई येथे रवाना झाले आहे.

50 कोटींचे उद्वीष्टयेः- ऊस तोड मजूर कामगारांचा दुष्काळी जिल्हा म्हणून बीड जिल्ह्याची ओळख आहे. हे चित्र बदलण्यासाठी बीड तालुक्यातील ईट येथील सूतगिरणीचे चेअरमन व विद्यमान संचालक मंडळ यांच्या अथक प्रयत्नांने, सूतगिरणी 20064 चात्यावर चालू आहे. सन 2020-21,2021-22 व 2022-23 ह्या आर्थिक वर्षात सूतगिरणीने एकूण रु. 34.85 कोटी सूताची शांघाय(चीन) व बांगलादेश येथे निर्यात केली असुन, उर्वरीत 156.52 कोटीच्या सूताची विक्री स्थानिक मार्केट मध्ये केलेली आहे. चालु आर्थिक वर्षात म्हणजे 2022-23 मध्ये परदेशात सूताची निर्यात 30 कोटी व लोकल मार्केट मध्ये 50 कोटीपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट आहे.
करियरची स्वप्नपुर्ती : उद्योगाकडे विशेषत, सूतगिरणीकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलल्याचे यातून दिसून येते. सूतगिरणीमध्ये सरासरी कुशल व अकुशल असे एकुण 300 कामगार असुन, बीड तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीमध्ये येथील युवकाना रोजगार मिळवून देण्यात गिरणीचे मोठे यश आहे. कामगारांना
प्राव्हीडंट फंड, फॅमिली पेन्शन, लाईफ इन्शुरन्सच्या सुविधा दिल्या जातात. गिरणीतील कामगारामध्ये गैरहजरीचे प्रमाण कमी करण्यासाठी महिनाभरात 26 दिवस हजर राहिल्यास स्पेशल अनुदानाची योजना
राबवली जात आहे. तालुक्यातील युवकांच्या करिअरचे स्वप्न माजी मंत्री जयदत्तजी क्षीरसागर यांच्या नेत्तृत्वाखाली पूर्ण झाले आहे.

कामगारांच्या हाताला रोजगार :
बीड मधील हंगाम उद्योग व्यवसायानंतर रोजगारांचा प्रश्न कायम असताना, बीड मतदारसंघामध्ये ईट येथील श्री गजानन सहकारी सूतगिरणी ही देखील अडचणीत होती. मात्र माजी मंत्री तथा चेअरमन जयदत्त क्षीरसागर यांनी या सूतगिरणीस पुनरुज्जीवित केले. आधुनिक यंत्र सामुग्री बरोबरच कुशल – अकुशल तसेच बाहेरील या क्षेत्राशी निगडीत हजारो बेरोजगारांना रोजगाराची संधी निर्माण करुन दिली.

Exit mobile version